पुणे

पुन्हा अवकाळी पाऊस; स्वाईन फ्लू फैलावण्याची भीती

मार्च महिन्याला सुरुवात होतेय. त्यामुळे आता खरं तर उकाड्याचं वातावरण असायला हवं. मात्र, आज दुपारपासून राज्यात अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण दिसलं. मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, रत्नागिरी अशा अनेक भागांत पावसानं हजेरीही लावली. यामुळे पिकांचं तर नुकसान होईलच शिवाय स्वाईन फ्लूही फैलावण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय.

Feb 28, 2015, 07:39 PM IST

अभिनेते अजय वढावकर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार

ज्येष्ठ अभिनेते आणि दूरदर्शनच्या 'नुक्कड' या लोकप्रिय मालिकेत गणपत हवालदाराची भूमिका साकारून घराघरात पोहोचलेले लोकप्रिय अभिनेते अजय वढावकर (५९) याचं आज पुण्यात शुक्रवारी निधन झालं. वढावकर यांच्यावर वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. 

Feb 28, 2015, 08:51 AM IST

शोधा... शोधा... रस्ता हरवलाय!

शोधा... शोधा... रस्ता हरवलाय!

Feb 27, 2015, 10:12 PM IST

नुक्कडचा 'गणपत हवालदार' सगळ्यांनाच रडवून गेला!

 हरहुन्नरी कलाकार अजय वढावकर यांचं आज पुण्यात निधन झालं. अनेक दिवसांपासून ते कॅन्सरने त्रस्त होते. काही वर्षांपूर्वी मधुमेहाच्या त्रासामुळे त्यांना आपला पाय गमवावा लागला होता

Feb 27, 2015, 08:11 PM IST

'प्रभूं'चं रेल्वे बजेट : पुणेकरांच्या प्रतिक्रिया...

पुणेकरांच्या प्रतिक्रिया...

Feb 26, 2015, 09:29 PM IST

पोळ यांची बदली प्लँचेटमुळेच, अजित पवारांचा गौप्यस्फोट

सामाजिक कार्यकर्ते डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणाचा तपास लावण्यासाठी पुणे पोलिसांनी चक्क प्लँचेटची मदत घेतली होती, असा गौप्यस्फोट माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलाय. म्हणूनच तत्कालीन पुणे पोलीस आयुक्त गुलाबराव पोळ यांची बदली करण्यात आल्याची कबुलीही अजितदादांनी दिलीय.

Feb 25, 2015, 03:29 PM IST

भाजप आमदार मेधा कुलकर्णींना स्वाईन फ्ल्यू

मुंबईसह राज्यात स्वाईन फ्ल्यूचा धोका वाढत आहे. रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. येथील भाजप आमदार मेधा कुलकर्णी यांना स्वाईन फ्लू लागण झाल्याचे सांगण्यात आले.

Feb 20, 2015, 02:36 PM IST

‘फर्लो’ रजेचा घोळ, संजय दत्तच्या शिक्षेत वाढ!

मुंबई बॉम्बस्फोटप्रकरणी शिक्षा झालेला चित्रपट अभिनेता संजय दत्त रजा (फर्लो) संपल्यानंतरही तुरुंगात हजर न झाल्यामुळं त्याच्या शिक्षेत आता आणखी चार दिवसांची वाढ होणार आहे. तसंच ‘फर्लो’च्या मुदतवाढीसाठी संजय दत्तनं केलेल्या अर्जावर निर्णय घेण्याबाबत घोळ घालणार्‍या अधिकार्‍यांवरही कडक कारवाई केली जाईल, असं गृहराज्यमंत्री राम शिंदे यांनी आज सांगितलं.

Feb 19, 2015, 08:12 AM IST