पुणे : मुंबईसह राज्यात स्वाईन फ्ल्यूचा धोका वाढत आहे. रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. येथील भाजप आमदार मेधा कुलकर्णी यांना स्वाईन फ्लू लागण झाल्याचे सांगण्यात आले.
मेधा कुलकर्णी या कोथरुडच्या आमदार आहेत. त्यांना बुधवारी स्वाईन फ्लूची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. तेव्हापासून त्यांच्यावर दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दरम्यान, मेधा कुलकर्णी यांची प्रकृतीत सुधारणा झाल्याची माहीती पती विश्राम कुलकर्णी यांनी दिली.
राज्यात आतापर्यंत स्वाईन फ्लूने ८३ जण दगावलेत. पुण्यातही रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ झाल्याने चिंता व्यक्त होत आहे. दरम्यान, स्वाईन फ्ल्यूने दोघांचा मृत्यू झाला. त्यामुळे चिंतेत अधिक भर पडली आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.