पुणे

आजीबरोबर खेळताना चिमुरडा बोअरवेलमध्ये पडला आणि...

पुणे जिल्ह्यातल्या पुरंदर तालुक्यात बोअरवेलमध्ये पडलेल्या अडीच वर्षांच्या मुलाला सुखरुप बाहेर काढण्यात आलं. दोनशे फूट खोल बोअरवेलमध्ये हा लहानगा अंदाजे अठरा ते वीस फूटांवर अडकला होता. पुणे आग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून या मुलाला, सुखरूप बाहेर काढलं. त्याला उपचारांसाठी पूण्यातल्या केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. 

Aug 6, 2015, 11:09 AM IST

झी २४ तास स्पेशल : एका हृदयाची कहाणी

एका हृदयाची कहाणी

Aug 5, 2015, 10:38 AM IST

VIDEO : समाजाचा बोथटपणा यातून तरी जाईल का?

अपघातग्रस्ताला त्याचक्षणी मिळालेली मदत त्याच्यासाठी जीवदान ठरू शकते. ही गोष्ट प्रत्येकाला माहिती असते, पण प्रत्यक्षात मदतीसाठी पुढे यायला कोणी धजावत नाही. नागरिकांच्या मनातली ही नकारात्मकता घालवण्यासाठी एका वाहतूक पोलिसाने चक्क लघूपटाच्या माध्यमातून जागरूकता करण्याचा प्रयत्न केलाय. 

Aug 5, 2015, 09:21 AM IST

पुण्यात मनसे नेत्याची हत्या

जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीच्या वादातून महाराष्ट्र नवनिर्माण नेत्याची गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. 

Aug 4, 2015, 11:02 PM IST

'मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे' वरची वाहतूक अजूनही खोळंबलेलीच

'मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे' वरची वाहतूक आजूनही खोळंबलेलीच आहे. खंडाळा बोगद्यासमोर कोसळलेल्या दरडीमुळे मुंबईकडे येणारी वाहतूक सुरू नसल्यानं पर्यायी मार्गावरून वाहतूक वळवण्यात आलीय. 

Aug 3, 2015, 11:38 AM IST

'एक्स्प्रेस-वे'वरील वाहतूक कोंडीने प्रवासी हैराण

'मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे'वर आजही ट्रॅफिक जामचा प्रवाशांना सामना करावा लागला यामुळे वाहन चालकांना तासंतास ताटकळत रहावं लागलं. मुंबईकडे येणाऱ्या वाहतुकीला याचा फटका बसला आहे.

Aug 2, 2015, 11:03 PM IST

एक उड्डाण असंही... दोघांचा जीव वाचविण्यासाठी सुखोईचा प्रवास

भारतीय लष्कराचं देशवासियांच्या मनातलं स्थान हे नेहमीच वरचं राहिलंय. जवानांचा त्याग, देशसेवेची त्यांची निष्ठा याचं आदरयुक्त कौतूक भारतीयांना आहे... शत्रूची कधीच गय न करणारे जवान अडचणीच्या प्रसंगीही धावून जातात... वायूदलाच्या एका छोट्याशा कृतीनं हेच पुन्हा एकदा अधोरेखित केलंय.

Aug 2, 2015, 11:53 AM IST

पुण्यातील दोघांचा दापोलीतील समुद्रात बुडून मृत्यू

दापोलीतील कर्दे समुद्र किनारी पोहायला गेलेल्या पुण्यातील दोन तरुणांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली. दुपारच्या सुमारास ही घटना घडली.

Aug 1, 2015, 10:31 PM IST

दरड कोसळल्याने मुंबई-पुणे महामार्गावरील वाहतूक विस्कळीत

खंडाळा घाटाजवळ दरड कोसळून मुंबई-पुणे महामार्गावरील मुंबईकडे येणारी वाहतूक विस्कळीत झाली आहे. त्यामुळे वाहतुकीची मोठी कोंडी येथे पाहायला मिळत आहे.

Aug 1, 2015, 07:13 PM IST