'एक्स्प्रेस-वे'वरील वाहतूक कोंडीने प्रवासी हैराण

'मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे'वर आजही ट्रॅफिक जामचा प्रवाशांना सामना करावा लागला यामुळे वाहन चालकांना तासंतास ताटकळत रहावं लागलं. मुंबईकडे येणाऱ्या वाहतुकीला याचा फटका बसला आहे.

Updated: Aug 2, 2015, 11:03 PM IST
'एक्स्प्रेस-वे'वरील वाहतूक कोंडीने प्रवासी हैराण title=

मुंबई : 'मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे'वर आजही ट्रॅफिक जामचा प्रवाशांना सामना करावा लागला यामुळे वाहन चालकांना तासंतास ताटकळत रहावं लागलं. मुंबईकडे येणाऱ्या वाहतुकीला याचा फटका बसला आहे.

काही दिवसांपूर्वी आडोशी बोगद्याजवळ अपघात झाला होता, आता खंडाळा घाटाजवळ पुन्हा दरड कोसळलीय. यामुळे शनिवारपासून मुंबई-पुणे एक्सप्रेस वेची वाहतूक कोलमडली आहे.

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर सुरू असलेल्या लहान-मोठ्या घटनांमुळे प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे. मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेचं दुरूस्तीचं कामंही सध्या हाती घेण्यात आल्याने, दोन्ही बाजूंनी काही ठिकाणी एकच लेन सुरू असल्याने वाहतूक मंदावते.

आज सकाळी आडोशी बोगद्याजवळचा अपघात ताजा असताना आता खंडाळा घाटाजवळ पुन्हा दरड कोसळली आहे. त्यामुळं कालपासून मुंबई-पुणे एक्सप्रेस वेची वाहतूक विस्कळीत आहे. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.