पुणे : जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीच्या वादातून महाराष्ट्र नवनिर्माण नेत्याची गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे.
मावळ तालुक्याचे मनसे अध्यक्ष बंटी उर्फ मंगेश वाळंज यांची कामशेतमध्ये काही अज्ञातांनी गोळ्या झाड़ून हत्या केली. वाळंज यांच्या समर्थकांनी कामशेत बंदची घोषणा करत काही वाहनं आणि दुकानांची तोडफोड केली. त्यामुळं परिसरात कमालीचं तणावपूर्ण वातावरण आहे.
तसेच मतदान केंद्रात घुसून EVM मशीन्सचीही तोडफोड केली. यावेळी तेथे उपस्थित असलेल्या माध्यमांच्या प्रतिनिधींना शिविगाळ आणि धक्काबुक्की करत कॅमेराही हिसकावण्याचा प्रयत्न काहींनी केला. मनसेकडून उद्या कामशेत बंदची हाक देण्यात आली आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.