'मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे' वरची वाहतूक अजूनही खोळंबलेलीच

'मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे' वरची वाहतूक आजूनही खोळंबलेलीच आहे. खंडाळा बोगद्यासमोर कोसळलेल्या दरडीमुळे मुंबईकडे येणारी वाहतूक सुरू नसल्यानं पर्यायी मार्गावरून वाहतूक वळवण्यात आलीय. 

Updated: Aug 3, 2015, 11:40 AM IST
'मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे' वरची वाहतूक अजूनही खोळंबलेलीच title=

पुणे: 'मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे' वरची वाहतूक आजूनही खोळंबलेलीच आहे. खंडाळा बोगद्यासमोर कोसळलेल्या दरडीमुळे मुंबईकडे येणारी वाहतूक सुरू नसल्यानं पर्यायी मार्गावरून वाहतूक वळवण्यात आलीय. 

काल रात्र रात्रभर या मार्गावर कोंडी होती. सकाळच्या सुमारास काही प्रमाणात कोंडी सुटली पण आता पुन्हा एकदा मुंबईकडे येणाऱ्या वाहनांचा वेग मंदावलाय. 

त्यामुळं आणखी आज आणि उद्या प्रवाशांना त्रास सहन करावा लागतोय. एक्सप्रेस वेवरील वाहतूक जुन्या मार्गावर वळवण्यात आलीय. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.