पुणे

पुण्यात भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध

पुण्यात भाजपचा जाहीरनामा आज प्रसिद्ध करण्यात आला. मेट्रो, स्मार्ट सीटी, रिंगरोडच्या माध्यमातून वाहतूक समस्या सोडवण्यावर जाहीरनाम्यात भर देण्यात आला. 

Feb 10, 2017, 02:57 PM IST

निवडणुकीच्या मौसमात पिसाळलेल्या माकडाची दहशत!

पुण्याच्या नांदेड गावात पिसाळलेल्या माकडाचा हैदोस सुरुच आहे. या माकडाची दहशत सीसीटीव्हीमध्ये कैद झालीय. आतापर्यंत या माकडानी 25 हून अधिक जणांना चावा घेतलाय. माकडाच्या दहशतीमुळे गावातल्या नागरिकांना दिवसाही घरं बंद ठेवावी लागतायत. तर माकडाला जेरबंद करण्यात वनविभागसुद्धा हतबल ठरलंय. 

Feb 10, 2017, 12:21 PM IST

पुण्यासाठी शिवसेनेचा वचननामा जाहीर

पुण्यासाठी शिवसेनेचा वचननामा जाहीर 

Feb 8, 2017, 02:27 PM IST

पुण्यासाठी शिवसेनेचा वचननामा जाहीर

पुण्यात आज शिवसेनेचा वचननामा जाहीर करण्यात आला. 162 जागांसाठी शिवसेनेचे 156 उमेदवार रिंगणात दाखल झालेत. यातील 149 उमेदवार हे धनुष्य बाणाच्या चिन्हावर निवडणूक लढवणार आहेत तर 7 जण पुरस्कृत उमेदवार आहेत. उल्लेखनीय म्हणजे पुण्यात शिवसेनेनं सर्वांत जास्त उमेदवार दिलेत.

Feb 8, 2017, 01:17 PM IST

पुण्यात शेवटच्या दिवशी 776 उमेदवारांचे अर्ज मागे

उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी पुण्यात 776 उमेदवारांनी अर्ज मागे घेतले.

Feb 8, 2017, 09:01 AM IST

पुणे ते कन्याकुमारी : 1500 किलोमीटर केवळ 11 दिवसांत

पुण्याचा रहिवासी असलेल्या आणखी एका तरुणानं सायकलसहीत वेगळी वाट धरत आपलं स्वप्न पूर्ण केलंय. पुणे ते कन्याकुमारी असं जवळपास 1500 किलोमीटरचं अंतर या तरुणानं अवघ्या 11 दिवसांत पूर्ण केलंय. 

Feb 7, 2017, 04:30 PM IST

पुण्यात २ उमेदवारांमध्ये जोरदार हाणामारी

 पुण्यातली महापालिका निवडणूकीची रणधुमाळी किती तापली आहे. याचं उत्तम उदाहरण आज घोले रोडच्या निवडणूक कार्यालयात बघायला मिळालं. घोले रोडच्य़ा कार्यालयात भाजपचे विद्यमान गटनेते गणेश बीडकर आणि मनेसेचे माजी गटनेते आणि आता काँग्रेसवासी झालेले रवींद्र धंगेकर यांच्यात जोरदार हाणामारी झाली.  

Feb 7, 2017, 03:03 PM IST

चिमुरडा नेता घनश्याम दराडे राष्ट्रवादीच्या प्रचार ताफ्यात दाखल

लोक म्हणतात घनश्याम लय भारी... पण, मी म्हणतो... राष्ट्रवादी काँग्रेस लय भारी... असं म्हणत दणक्यात चिमुरड्या घनश्याम दराडेनं आपल्या पुण्यातल्या भाषणाला सुरुवात केली... आणि आपोआपच अनेक श्रोत्यांचं लक्ष आपसुकच राष्ट्रवादीकडे वळलंय. 

Feb 7, 2017, 01:39 PM IST

गडावर आले पण शुल्क नाही भरले

पुण्यातील भाजपच्या उमेदवारांनी आज मोठा गाजावाजा करत सुराज्याची शपथ घेतली. नरवीर तानाजी मालुसरेंच्या बलिदानानं पावन झालेल्या सिंहगडावर हा कार्यक्रम झाला. मात्र विरोधाभास असा की या कार्यक्रमासाठी आलेल्या एकाही पुढा-यानं आणि कार्यकर्त्यानं गडावर जाण्यासाठीचं प्रवेश शुल्क भरलं नाही. 

Feb 6, 2017, 10:57 PM IST

सुराज्याची शपथ घेण्यासाठी भाजप कार्यकर्ते विदाऊट टोल

पुण्यातील भाजपच्या उमेदवारांनी आज मोठा गाजावाजा करत सुराज्याची शपथ घेतली.

Feb 6, 2017, 07:41 PM IST