पुण्यात शेवटच्या दिवशी 776 उमेदवारांचे अर्ज मागे

उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी पुण्यात 776 उमेदवारांनी अर्ज मागे घेतले.

Updated: Feb 8, 2017, 09:01 AM IST
पुण्यात शेवटच्या दिवशी 776 उमेदवारांचे अर्ज मागे title=

पुणे : उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी पुण्यात 776 उमेदवारांनी अर्ज मागे घेतले.

आता पुण्यातील 162 जागांसाठी 1076 उमेदवार रिंगणात आहेत. यात राष्ट्रवादी काँग्रेसचे बंडखोर नितीन कदम, काँग्रेसचे मारुती मोहिते, आसलम बागवान, भाजपतील बंडखोर ज्योत्स्ना सरदेशपांडे, सतिश बहिरट यांचा समावेश आहे तर लोहियानगर मधील काँग्रेसचे बंडखोर सुधीर जानजोत यांनी उमेदवारी कायम ठेवलीय.
 
पुण्यात बंडखोरी शमवण्यात राजकीय पक्षांना बऱ्यापैंकी यश आलंय. त्यामुळे अपवाद वगळता अपक्षांचा फारसा परिणाम निवडणुकीत जाणवणार नाही.