पुणे : पुण्यात भाजपचा जाहीरनामा आज प्रसिद्ध करण्यात आला. मेट्रो, स्मार्ट सीटी, रिंगरोडच्या माध्यमातून वाहतूक समस्या सोडवण्यावर जाहीरनाम्यात भर देण्यात आला.
प्रत्येक प्रभागात भाजी मंडई, अग्निशमन दल, वायफाय, आणि शहरी जलयुक्त शिवारची योजना आणण्याची भाजपनं जाहीरनाम्यात घोषित केलंय. याशिवाय प्रत्येक प्रभागासाठी स्वतंत्र जाहीरनामा प्रसिद्ध करण्याचाही भाजपचा मानस आहे.
त्याचप्रमाणे गेल्या 15 वर्षात पालिकेनं राबलेल्या सर्व प्रकल्पांची चौकशी करण्याचंही भाजपनं आश्वासन दिलंय. तिकडे नाशिकमध्येही आज भाजपनं आपला ध्येयनामा प्रसिद्ध केला. शहरात वैद्यकीय महाविद्यालय, विमानसेवा, पूररेषा अशा आश्वासनांनी मतदार आकृष्ट करण्याचा प्रयत्न भाजपनं केलाय.