पुण्यासाठी शिवसेनेचा वचननामा जाहीर

पुण्यात आज शिवसेनेचा वचननामा जाहीर करण्यात आला. 162 जागांसाठी शिवसेनेचे 156 उमेदवार रिंगणात दाखल झालेत. यातील 149 उमेदवार हे धनुष्य बाणाच्या चिन्हावर निवडणूक लढवणार आहेत तर 7 जण पुरस्कृत उमेदवार आहेत. उल्लेखनीय म्हणजे पुण्यात शिवसेनेनं सर्वांत जास्त उमेदवार दिलेत.

Updated: Feb 8, 2017, 01:17 PM IST
पुण्यासाठी शिवसेनेचा वचननामा जाहीर  title=

पुणे : पुण्यात आज शिवसेनेचा वचननामा जाहीर करण्यात आला. 162 जागांसाठी शिवसेनेचे 156 उमेदवार रिंगणात दाखल झालेत. यातील 149 उमेदवार हे धनुष्य बाणाच्या चिन्हावर निवडणूक लढवणार आहेत तर 7 जण पुरस्कृत उमेदवार आहेत. उल्लेखनीय म्हणजे पुण्यात शिवसेनेनं सर्वांत जास्त उमेदवार दिलेत.

वचननाम्यात काय आहे पाहुया...

- रस्ते विकास करणार, उड्डाणपूल उभारणार

- रिंग रोड विक्रमी वेळेत पूर्ण करणार

 मेट्रो प्रकल्पाला गती देण्यासाठी महापालिकेचा स्वतंत्र कक्ष स्थापणार

- पीएमपीलचा प्रवास येत्या ५ वर्षांत मोफत करणार

- १५०० नविन बसेसची खरेदी करणार

- पारदर्शक कारभारासाठी ई - गव्हर्नन्सवर भर देणार

- संपूर्ण शहराला २४ तास समान पाणी पुरवठा करणार

- गरिबांना मोफत उपचारांसाठी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आरोग्य कवच योजना राबवणार

- स्वतंत्र कंपनी स्थापन करून झोपडपट्टी पुनर्वसन करणार

- झोपडपट्टीवासियांचे सेवा शुल्क माफ करणार

- पुणे शहर प्लास्टिकमुक्त करणार

- प्रत्येक प्रभागात कचरा प्रक्रिया प्रकल्प उभारणार

- शिक्षण मंडळाच्या शाळांचा दर्जा सुधारणार

- ज्येष्ठ नागरिकांना मोफत औषधे देणार

- राजमाता जिजाऊ महिला सक्षमीकरण योजनेद्वारे महिलांना रोजगार

- महिलांना सुरक्षा देणार

- युवकांना रोजगार देणार