पालिका निवडणूक

डोंबिवलीत भाजप कार्यकर्त्यावर तलवारीने हल्ला

कल्याण डोंबिवलीत आज मतदानाच्या दिवशी भाजप - मनसे कार्यकर्त्यांत राडा पाहायला मिळाला. भाजप कार्यकर्त्यांवर तलवारीने हल्ला करण्यात आला. दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत अनर्थ टाळला.

Nov 1, 2015, 07:23 PM IST

केडीएमसीत ४८ तर कोल्हापुरात ६४ टक्के मतदान, लक्ष निकालाकडे

 कल्याण डोंबिवली महानगरपालिकेसाठी कमी मतदान झाल्याचे नोंद झालेय. येथे ४८ टक्के मतदान तर कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी चांगले मतदान झाले. कोल्हापुरात ६४ टक्के मतदान झालेय. आता उद्या होणाऱ्या मतमोजणीकडे लक्ष लागले आहे. कोण बाजी मारणार याची उत्सुकता टिपेला पोहचलीय. दरम्यान, कल्याण डोंबिवलीत भाजपा - मनसे कार्यकर्ते भिडलेत. मनसेच्या सुभाष पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी भाजपचे कार्यकर्ते नितीन पालन यांच्यावर तलवार हल्ला केल्याचे सांगण्यात येत आहे.

Nov 1, 2015, 06:13 PM IST

केडीएमसी निवडणूक : सेना खासदार, आमदारांना नोटीस तर भाजपकडून आचारसंहितेचा भंग

निवडणूक प्रचारात शिवसेना-भाजप यांच्यात जोरदार खडाजंगी उडालेली पाहिली. आता दोन्ही राजकीय पक्षांना पुन्हा आरोप-प्रत्यारोप सुरु केलेत. शिवसेना खासदार, आमदार यांना आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी नोटीस तर भाजपकडून आचारसंहितेचा भंग झालास, असा आरोप शिवसेनेने केलाय.

Nov 1, 2015, 04:21 PM IST

कल्याण डोंबिवलीचा प्रचार तोफा थंडावल्या

रविवारी एक नोव्हेंबरला होत असलेल्या कल्याण डोंबिवली आणि कोल्हापूर महापालिका निवडणूक प्रचाराच्या तोफा संध्याकाळी थंडावल्या. 

Oct 30, 2015, 07:27 PM IST

का दिला होता एकनाथ शिंदेंनी राजीनामा?

 भाजपकडून पोलिसांच्या मदतीने शिवसैनिकांची दडपशाही केली जात असल्याची टीका करत पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी भर सभेत उद्धव ठाकरे यांच्याकडे मंत्रिपदाचा राजीनामा सोपवला... 

Oct 30, 2015, 05:44 PM IST

एकनाथ शिंदेंचा राजीनामा म्हणजे नाटक - मुख्यमंत्री

शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यासपीठावर राजीनामा दिल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चांगलाचे फटकारले आहे. राजीनामा हे फक्त नाटक आहे. ती नाटक कंपनी फार हुशार आहे. त्यांना ते चांगलं जमतं असेही मुख्यमंत्री म्हणाले. 

Oct 30, 2015, 05:18 PM IST

कामं केलं नाही, बाळासाहेबांचं नाव घेऊन मतं मागताहेत - राज ठाकरे

नाशिकमधील कामाचा आढावा घेऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कल्याण डोंबिवलीचा गड सर करण्याचा प्रयत्न केला. 

Oct 28, 2015, 08:22 PM IST

आमच्या मित्रांच्या पोटात दुखतं - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

कल्याण डोंबिवलीचा विकास कोण करणार तर ते फक्त आणि फक्त भारतीय जनता पक्ष करणार, गेल्या १५ वर्षापासून सत्तेत असलेल्या शिवसेनेने कल्याण डोंबिवलीचं 'कल्याण' केले असा उपरोधिक टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज लगावला. 

Oct 28, 2015, 07:53 PM IST

केडीएमसी निवडणूक : २७ गावांचा मुद्दा दिवसेंदिवस चिघळतोय

कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीत २७ गावांचा मुद्दा दिवसेंदिवस चिघळत चाललाय. निवडणुकींवर बहिष्कार टाकण्यावर ठाम असलेली संघर्ष समिती आता निवडणुकीच्या रिंगणात उतरली. त्यामुळे २७ गावांतील मतदार आणि इतर पक्षांची चांगलीच गोची झाली आहे. अशातच संघर्ष समितीच्या या पवित्र्याचा शिवसेनेला फायदा होणार की नुकसान याकडे सगळ्यांचं लक्ष लागले आहे.

Oct 24, 2015, 11:03 AM IST

पूर्ण सत्ता द्या, कल्याण-डोंबिवलीचे नवनिर्माण करतो : राज

महानगरपालिकेची पूर्ण सत्ता द्या, कल्याण- डोंबिवलीचे नवनिर्माण करतो, असे डोंबिवलीतल्या जाहीर सभेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंचं जनतेला साकडं घातले. नाशिकप्रमाणं केडीएमसीत कायापालट करण्याचं आश्वासन राज यांनी यावेळी दिले.

Oct 24, 2015, 07:27 AM IST

राज ठाकरेंनी डागली मोदींवर तोफ

कल्याण डोंबिवलीत राज ठाकरे यांनी मोदी आणि देवेंद्र फडणवीस सरकारवर जोरदार तोफ डागली. पण त्यांच्या तोफगोळ्यांमध्ये आज शिवसेनेवर जास्त हल्ले झाले नाहीत. 

Oct 23, 2015, 09:09 PM IST

केडीएमसी निवडणूक - ''गोल्डन गॅंग'साठी सर्व पक्षांची हात मिळवणी

 कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणूकीने आता जोर धरला असून, निवडून येण्याकरता सर्वच उमेदवारांनी आणि पक्षांनी आपली सर्व ताकद पणाला लावली आहे. तर दुसरीकडे काही असे उमेदवार निवडून यावेतच याकरता सर्वच पक्षांनी हातमिळणी केली आहे. ते उमेदवार आहेत "गोल्डन गॅंगचे". या गोल्डन गॅंगचे उमेदवार निवडून जर आले नाही तर सर्वच पक्षांचे मोठे आर्थिक नुकसान होईल. म्हणून ही गोल्डन गॅंग आणि त्याचे उमेदवार निवडणून यावेत याकरता सर्वच पक्षांनी हातमिळवणी केली आहे.

Oct 23, 2015, 01:18 PM IST