पालिका निवडणूक

राष्ट्रवादीचा काँग्रेसला इशारा, आम्ही वाट बघणार नाही!

मुंबई महापालिकेत आघाडीसाठी आम्ही काँग्रेसची वाट बघणार नाही. आम्ही स्वतंत्र निवडणूक लढवण्यास तयार आहोत, असा स्पष्ट इशारा राष्ट्रवादीने काँग्रेसला दिला आहे.

Nov 17, 2016, 07:36 PM IST

दोंडाईचा शिरपूरची सत्तासुंदरी कोणाकडे...

राजकारणात घराणेशाही हा परवलीचा आणि कार्यकत्यांच्या अंगवळणी पडलेला शब्द झालाय. सत्ताधरी असो की विरोधक प्रमुख नेते... सत्तासुंदरी आपल्या घराबाहेर पडू नये असं नियोजन नेहमी करत असतात. घराणेशाहीचा अनोखा सोहळा धुळे जिल्ह्यातील मतदार अनुभवतायत. जिल्ह्यातील दोंडाईचा आणि शिरपूर पालिकेच्या निवडणुकीत नगराध्यक्ष पदाचे प्रमुख उमेदवार घराणेशाहीतूनच मतदारांसमोर आले आहेत. 

Nov 7, 2016, 10:07 PM IST

जुन्नरचा गड कोण राखणार?

जुन्नर पालिकेत कुणाची सत्ता येणार, जुन्नकर कुणाच्या ताब्यात नगर परिषदेचा कारभार सोपवणार... 

Nov 7, 2016, 09:32 PM IST

कराडचा आखाडा कोण जिंकणार?

कराड नगरपालिकेत चौरंगी लढत होतेय... कराड नगरपालिका पश्चिम महाराष्ट्रातली राजकीय दृष्ट्या महत्त्वाची समजली जाणारी पालिका....याठिकाणी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागलीय.  

Nov 7, 2016, 09:17 PM IST

जालना पालिकेत मंत्री अर्जुन खोतकरांची प्रतिष्ठा पणाला..

जालना पालिकेवर वर्चस्व मिळवण्यासाठी सत्ताधारी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीनं तसंच भाजप-शिवसेना युतीनंही जोरदार मोर्चेबांधणी सुरू केलीय. यानिमित्तानं शिवसेनेचे राज्यमंत्री अर्जुन खोतकर आणि काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंटयाल या दोन्ही नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागलीय.

Nov 7, 2016, 09:04 PM IST

मालवण नगरपालिकेवर कुणाचा झेंडा फडकणार ?

मालवण शहरात नगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालीय. ग्रामदैवत श्री देव रामेश्वराला साकडं घालून शिवसेना-भाजप युती आणि काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीनं प्रचाराचा शुभारंभ केलाय...

Nov 7, 2016, 08:52 PM IST

भंडाऱ्यात प्रफुल्ल पटेल तर नाना पटोलेंची प्रतिष्ठापणाला

 जिल्ह्यात राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल तर भाजप खासदार नाना पटोलेंची प्रतिष्ठा पणाला लागलीय. भंडारा म्हणजे राष्ट्रवादीचा बालेकिल्ला. पण लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत भाजपनं राष्ट्रवादीला झटका दिला. त्यामुळे नगरपालिका निवडणुकीत आता चुरस निर्माण झालीय.

Oct 21, 2016, 10:17 PM IST

तुमसर नगर परिषदेमधील राष्ट्रवादी सत्ता कायम राखणार का?

जिल्ह्यातल्या तुमसर नगर परिषदेत सद्यस्थितीत राष्ट्रवादीची सत्ता आहे. मात्र यावेळी भाजप बाजी मारणार का? याची उत्सुकता आहे.  

Oct 21, 2016, 10:11 PM IST

वर्ध्यात भाजप विरुद्ध राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये चुरस

जिल्ह्यात भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसकडे दोन-दोन नगरपालिका आहे. मात्र यंदा सर्वच ठिकाणी वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी सर्वच पक्ष कामाला लागलेत. 

Oct 21, 2016, 12:07 AM IST

राष्ट्रवादीच्या पूर्व विदर्भ गडात भाजपची सत्ता, पटेल-बडोलेंची प्रतिष्ठा पणाला

 गोंदिया हा राष्ट्रवादीचा गड समजला जात असला तरी सध्या इथं भाजपची सत्ता आहे. प्रफुल्ल पटेल आणि राजकुमार बडोलेंची प्रतिष्ठा याठिकाणी पणाला लागलीय. 

Oct 19, 2016, 06:06 PM IST

तिरोडा नगर परिषद निवडणुकीत राष्ट्रवादीला कोण शह देणार?

जिल्ह्यातील तिरोडा नगर परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी आपली सत्ता कायम राखणार का, याची उत्सुकता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच याठिकाणी सर्वेसर्वा असली तरी त्यांना मात देण्यासाठी भाजपनं कंबर कसली आहे. 

Oct 19, 2016, 05:27 PM IST

न.प. निवडणुकीत नागपुरात भाजपला जोरदार फटका बसणार?

शेतीच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केल्याने शेतकरी नाराज आहेत. त्याचाच फटका भाजपला बसेल असा दावा विरोधकांनी केला आहे. आगामी नगर परिषद निवडणुकीत सत्ता काबीज करण्याचं लक्ष भाजपचं असलं तरी वाटतो तेवढा हा प्रवास सोपा नक्कीच नाही. नागपुरातली काटोल नगर परिषद लक्षवेधी ठरणार आहे. काय वैशिष्ट्य आहेत इथली... कोण कुणाला आव्हान देऊ शकतं पाहूयात त्यासंदर्भातला रिपोर्ट. 

Oct 18, 2016, 11:00 PM IST