डोंबिवली : कल्याण डोंबिवलीत राज ठाकरे यांनी मोदी आणि देवेंद्र फडणवीस सरकारवर जोरदार तोफ डागली. पण त्यांच्या तोफगोळ्यांमध्ये आज शिवसेनेवर जास्त हल्ले झाले नाहीत.
पाहा राज ठाकरेंच्या भाषणातील ठळक मुद्दे
- केंद्रात आणि राज्यात काँग्रेस जाऊन भाजपची सत्ता आली तरी लोकांच्या मनातली असुरक्षिततेची भावना दूर झालेली नाही - राज ठाकरे
- पाच वर्षासाठी माझ्या हाती सत्ता देऊन बघा कल्याण-डोंबिवलीचे रुप बदलून टाकेन जर जमले नाही तर पुन्हा केडीएमसची निवडणूक लढवणार नाही - राज ठाकरे
- आता काही ठिकाणी जैन लोकांनी डोकं वर काढायला सुरुवात केली आहे - राज ठाकरे
- ठाणे जिल्ह्यात सात महानगरपालिका आहेत, अचानक एवढी लोकसंख्या वाढलीच कशी? - राज ठाकरे
- मीरा-भाईंदरमध्ये नायजेरियन लोकांचा उच्छाद सुरु आहे; ड्रग्सची तस्करी, बलात्कार सारखे गंभीर गुन्हे नायजेरियन करतात पण त्यांच्यावर कोणतीही कारवाई होत नाही - राज ठाकरे
- बाहेरच्या शत्रूचे काय बोलता आधी इथे घरातच बेकायदा घुसखोरी वाढत आहे त्यावर उपाय करा - राज ठाकरे
- भाजप-सेनेने २० वर्षात कल्याण-डोंबविलीची वाट लावली - राज ठाकरे
- सत्तेत काँग्रेस असू दे नाही तर भाजपा फरक पडलेला नाही - राज ठाकरे
- दिल्लीला विचारल्याशिवाय महाराष्ट्रात काहीच होत नाही - राज ठाकरे
- याच सरकारच्या कार्यकाळात डान्स बार सुरु झाले, डाळी महाग झाल्या, मांस बंदीचा वाद झाला, दुष्काळ आला - राज ठाकरे
- १०० दिवसांत अच्छे दिन आणणार होते, ५०० दिवस आहेत अजून अच्छे दिन आले नाही - राज ठाकरे
- थापाला पर्यायी शब्द आहे भाजपा - राज ठाकरे
- मुख्यमंत्री दिल्लीश्वरांपुढे सतत वाकत असतात - राज ठाकरे
- कल्याण-डोंबविली पालिकेसाठी ६५०० कोटींचे पॅकेज ही निव्वळ थाप, सरकारकडे पैसेच नाही - राज ठाकरे
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.