मुंबई : शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यासपीठावर राजीनामा दिल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चांगलाचे फटकारले आहे. राजीनामा हे फक्त नाटक आहे. ती नाटक कंपनी फार हुशार आहे. त्यांना ते चांगलं जमतं असेही मुख्यमंत्री म्हणाले.
कल्याण डोंबिवलीत आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे. यावेळी भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी आयोजीत करण्यात आलेल्या प्रचार सभेत मुख्यमंत्री बोलत होते.
ते म्हणाले, एकनाथ शिंदे यांचा राजीनामा हे एक नाटक आहे. हा राजीनामा खरा नाही. भाजपच्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेच्या दहशतीला घाबरू नये, असा सल्लाही यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिला.
कामचं केले नाही तर पराभव दिसू लागला आहे. त्यामुळे ही नौटंकी सुरू आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.