कल्याण डोंबिवलीचा प्रचार तोफा थंडावल्या

रविवारी एक नोव्हेंबरला होत असलेल्या कल्याण डोंबिवली आणि कोल्हापूर महापालिका निवडणूक प्रचाराच्या तोफा संध्याकाळी थंडावल्या. 

Updated: Oct 30, 2015, 07:27 PM IST
कल्याण डोंबिवलीचा प्रचार तोफा थंडावल्या title=

कल्याण : रविवारी एक नोव्हेंबरला होत असलेल्या कल्याण डोंबिवली आणि कोल्हापूर महापालिका निवडणूक प्रचाराच्या तोफा संध्याकाळी थंडावल्या. 

मात्र या प्रचाराच्या निमित्तानं कल्याण डोंबिवलीमध्ये शिवसेना आणि भाजप दोघांनीही एकमेकांविरोधात आरोप-प्रत्त्यारोपांचे तोफगोळेच डागले. दोन्ही पक्षांच्या ज्येष्ठ नेत्यांच्या मुलुखमैदानी तोफा या प्रचारादरम्यान सतत धडाडत होत्या. 

कल्याण डोंबिवलीमधला प्रचाराचा आजचा शेवटचा दिवस त्यामुळे चांगलाच स्फोटक ठरला. त्याचवेळी कोल्हापूरमध्ये मात्र शेवटच्या दिवशी जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी, उमेदवारांची लगबग दिसून आली. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.