कामं केलं नाही, बाळासाहेबांचं नाव घेऊन मतं मागताहेत - राज ठाकरे

नाशिकमधील कामाचा आढावा घेऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कल्याण डोंबिवलीचा गड सर करण्याचा प्रयत्न केला. 

Updated: Oct 28, 2015, 11:29 PM IST
कामं केलं नाही, बाळासाहेबांचं नाव घेऊन मतं मागताहेत - राज ठाकरे  title=

कल्याण : नाशिकमधील कामाचा आढावा घेऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कल्याण डोंबिवलीचा गड सर करण्याचा प्रयत्न केला. 

राज ठाकरे यांनी पहिल्यांदा हायटेक प्रचार दिसला. त्यांनी अॅपलाचा लॅपटॉप घेऊन नाशिक विकासाची झलक दाखवली. 

राज ठाकरेच्या भाषणातील मुद्दे 
- नाशिकमध्ये काय केलं याची झलक दाखवायची होती - राज ठाकरे 
- नाशिक हातात दिलं काय केलं, असं म्हणून तुटून पडले होते - राज ठाकरे 
- इतर पक्षांना विचारत नाही - राज ठाकरे 
- आता नाशिकमधील विकास पाहिल्यावर लोकांची तोंड बंद झाली - राज ठाकरे 
- २० वर्षांच्या जाहीरनाम्यातील मुद्दे आजही सांगताहेत - राज ठाकरे 
- गेल्या २० वर्षात केंद्र, राज्य सरकार, इतर कराच्या माध्यमातून १५ हजार कोटी आले - राज ठाकरे 
- कुठे गेले १५ हजार कोटी रुपये - राज ठाकरे 
- आपण केलेल्या कामाचं जाहीर सभेत प्रेझेंटेशन 
- काम दाखवून शकत नाही तर होर्डिंग लावाचं एक मत बाळासाहेबसाठी - राज ठाकरे 
- काम करायचं नाही आणि बाळासाहेबांच्या नावाने मतं मागायची - राज ठाकरे 
- आता पुन्हा आले आहेत निधड्या छातीने आता थोडे दिवस द्या वाट लावायला - राज ठाकरे 
- २०१२ ते २०१५ विकासाचा आलेख दाखवला राज ठाकरे यांनी 
- नाशिकला बराच काळ आयुक्त दिला नाही. साडे तीन वर्षात १३ महिनेच आयुक्त दिला - राज ठाकरे 
- नाशिकमध्ये ज्या क्वालिटीची रस्ते मिळाले ते तुम्हांला का नाही मिळाले, कल्याण डोंबिवलीकरांना प्रश्न 

- मुलभूत गरजा देऊ शकत नाही, तर काय करायच्या आहेत निवडणुका - राज ठाकरे

- नाशिकच्या विकासात रतन टाटा आणि मुकेश अंबानींची   मदत मोलाची - राज ठाकरे
- जे नाशिकमध्ये केलं ते कल्याण-डोंबिवलीमध्येपण आणु शकतो, फक्त सत्ता दया मला - राज ठाकरे
- केंद्रात आणि राज्यात युती सत्ता आहे ना? मग डम्पिंग ग्राउंड शहराबाहेर का नाही नेऊ शकत? - राज ठाकरे 
- नाशिकनंतर आता, "नवनिर्माण" कल्याण-डोंबिवलीचं- राज ठाकरे 
कामं केली असती, तर सावरकर-टिळकांच्या नावाने मत मागण्यची वेळ आली नसती - राज ठाकरे

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.