Rohit sharma: रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने 29 जून रोजी बार्बाडोसमध्ये टी-20 वर्ल्डकपवर आपलं नाव कोरलं. ज्या क्षणाची भारतीय चाहते गेल्या 11 वर्षांपासून वाट पाहत होते, तो क्षण रोहित शर्माच्या सेनेने दाखवला. या वर्ल्डकप विजयानंतर टीम इंडिया गुरुवारी भारतात परतली. यावेळी दिल्लीतील स्वागतानंतर टीम इंडियाच्या खेळाडूंचं भारतात देखील स्वागत करण्यात आलं. देशाला चॅम्पियन बनवण्यासाठी रोहित शर्मा तब्बल महिन्याभरापेक्षा जास्त दिवस बाहेर होता. यावेळी तो त्याच्या आई वडिलांपासून देखील दूर होता. तर गुरुवारी टीम मुंबईत आल्यानंतर रोहित शर्माच्या आईने त्याची भेट घेतली. यावेळी या दोघांच्या भेटीचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय.
गुरुवारी मुंबईत आल्यानंतर रोहित शर्माने वानखेडे स्टेडियमवर त्याच्या आई-वडिलांची भेट घेतली. रोहित आईला भेटताना क्षण बघण्यासारखा होता. भर गर्दीत रोहितच्या आईने त्याचं चुंबन घेतलं. यावेळी त्याचे वडीलही त्या ठिकाणी उपस्थित होते.
प्रत्येक पालकांप्रमाणे 4 जुलै हा दिवस रोहित शर्माच्या पालकांसाठी अभिमानाने भरलेला होता. अखेर त्यांचा मुलगा वर्ल्ड चॅम्पियन बनून मायदेशी परतला होता. संपूर्ण देश आपल्या मुलाला सलाम करतोय हे पाहणं कोणत्याही आई-वडिलासांठी मोठी गोष्ट होती. रोहितच्या आई-वडिलांनी अनेक दिवस आपल्या मुलाला पाहिले नव्हते. त्यामुळे तेही मुलाच्या आनंदात सहभागी होण्यासाठी वानखेडे स्टेडियमवर पोहोचले.
माँ तो माँ होती है, रोहित शर्मा की भी! #VictoryParade of BCCI pic.twitter.com/lX2PuXBxnH
— Sabloktantra (@SabLokTantra) July 4, 2024
एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत रोहितची आई पूर्णिमा शर्मा यांनी सांगितलं की, त्यांची तब्येत बरी नाही. आज त्यांची डॉक्टरांची अपॉईंटमेंट होती. मात्र त्यांना मुलाचा खास क्षण चुकवायचा नव्हता. त्यांचं कुटुंबीय बऱ्याच दिवसांपासून या क्षणाची वाट पाहत होते. त्यामुळे या आनंदात सामील होण्यासाठी त्या स्टेडियमवर आल्या आहेत. रोहित वर्ल्ड कपसाठी निघण्यापूर्वी असा दिवस बघायला मिळेल, असा विचारही केला नव्हता.
रोहित शर्माच्या आईच्या म्हणण्यानुसार, रोहित शर्माने जाण्यापूर्वीच सांगितलं होतं की, त्याला वर्ल्ड कपनंतर टी-20 इंटरनॅशनल सोडायचं आहे. यावेळी मी त्याला वर्ल्डकप जिंकूनच परत येण्यास सांगितलं होतं. माझ्या मुलाला इतकं प्रेम मिळतंय हे पाहून रोहितच्या आईचा विश्वास बसत नाहीये. असं वातावरण आजपर्यंत कधीच पाहिलं नाही, हे सर्व रोहितच्या मेहनतीचे फळ आहे.