पालिका निवडणूक

भाजपची नाशिकमधील उमेदवारांची यादी नाहीच!

उमेदवारी अर्ज भरण्यासाठी शुक्रवारी शेवटचा दिवस असतानाही नाशिकमध्ये भाजप उमेदवारांची यादी जाहीर झालेली नाही. याच पार्श्वभूमीवर उमेदवारांची यादी भाजप जाहीर करणार नाही. 

Feb 2, 2017, 09:54 PM IST

शिवसेनेची दक्षिण मुंबईतील उमेदवार यादी जाहीर

 आता शिवसेनेने दक्षिण मुंबई शिवसेना उमेदवार यादी जाहीर केली आहे. 

Feb 2, 2017, 08:21 PM IST

नागपुरात भाजपची यादी गुलदस्त्यात, बंडखोरीच्या धास्तीने एबी फॉर्म वाटप

भाजपची यादी लांबणीवर पडली आहे. पार्लमेंट्री बोर्डची बैठक परत रात्री 8 वाजता होणार आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात बैठक झाली. मात्र, अद्याप उमेदवारांची यादी जाहीर झालेली नाही. दरम्यान, गडकरी मुख्यमंत्री बैठकीत १०० नावांवर शिक्कामोर्तब करण्यात आल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. 

Feb 2, 2017, 07:14 PM IST

बंडखोर विरूद्ध निष्ठावंत शिवसैनिक सामना, नाराजांना 'मातोश्री' वर पाचारण

महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेला जोरदार झटका बसलाय. शिवसेनेच्या तिघा ज्येष्ठ नगरसेवकांनी पक्षाला रामराम ठोकून भाजपमध्ये प्रवेश केलाय. त्याशिवाय ठिकठिकाणी शिवसेनेला बंडखोरीनं ग्रासलं असून, बंडोबांना थंडोबा करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. यानिमित्त बंडखोर विरूद्ध निष्ठावंत शिवसैनिक असा सामना सुरू झालाय.

Feb 2, 2017, 06:35 PM IST

भाजपला टक्कर देण्यासाठी मुलुंडमध्ये शिवसेनेची खेळी

मुलुंडमध्ये मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेना भाजप असा संघर्ष होणार आहे. मुलुंड हा भाजपचा बालेकिल्ला ओळखला जातो. मात्र, खासदार किरीट सोमय्या यांनी शह देण्यासाठी शिवसेनेने गुजराती कार्डचा वापर केलाय.

Feb 2, 2017, 05:37 PM IST

रावसाहेब दानवे यांचे वादग्रस्त वक्तव्य, निवडणुकीत 'लक्ष्मी' महत्वाची!

मतदानाच्या आदल्या दिवशीची संध्याकाळ महत्वाची असते. आदल्या दिवशी घरात लक्ष्मी येते. तिचा स्वीकार करा, असे वादग्रस्त वक्तव्य  रावसाहेब दानवे यांनी पैठण येथे केले.  

Dec 17, 2016, 06:38 PM IST

पुण्यातल्या 10 तर लातूरमधील 4 पालिकांसाठी मतदान सुरु

नगरपालिका निवडणुकीच्या दुस-या टप्प्यातल्या 14 पालिकांसाठी आज मतदानाला सुरुवात झालीये. पुणे जिल्ह्यातल्या 10 तर लातूर जिल्ह्यातल्या 4 पालिकांसाठी हे मतदान होतंय. मतदानानंतर उद्याच मतमोजणी होणार आहे.

Dec 14, 2016, 09:20 AM IST

पालिका निवडणूक : बारामतीत राष्ट्रवादीला शह देण्यासाठी भाजपची विकास आघाडी

जिल्ह्यातील सर्वात जुनी नगरपालिका असा नावलौकिक असलेली बारामती नगरपालिका निवडणूक येत्या १४ डिसेंबरला होत आहे. निवडणुकीत राष्ट्रवादीला स्पष्ट बहुमत मिळाले होते.  केवळ एकाच जागेवर अपक्ष नगरसेवक विजयी झाला होता. राष्ट्रवादीला शह देण्यासाठी भाजपसह शिवसेना, राष्ट्रीय समाज पक्ष यांची सर्वपक्षीय आघाडी झाली आहे.

Dec 9, 2016, 08:18 PM IST

नगरपरिषद निवडणुकीत म्हणून भाजपला यश मिळाले...

महाराष्ट्र राज्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीत परफॉर्मन्स दाखवा, अशा स्पष्ट सूचना थेट दिल्लीतूनच देण्यात आल्याने, भाजपला घवघवीत यश मिळाल्याचं आता पुढे येत आहे.

Nov 29, 2016, 12:03 PM IST