केडीएमसी निवडणूक - ''गोल्डन गॅंग'साठी सर्व पक्षांची हात मिळवणी

 कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणूकीने आता जोर धरला असून, निवडून येण्याकरता सर्वच उमेदवारांनी आणि पक्षांनी आपली सर्व ताकद पणाला लावली आहे. तर दुसरीकडे काही असे उमेदवार निवडून यावेतच याकरता सर्वच पक्षांनी हातमिळणी केली आहे. ते उमेदवार आहेत "गोल्डन गॅंगचे". या गोल्डन गॅंगचे उमेदवार निवडून जर आले नाही तर सर्वच पक्षांचे मोठे आर्थिक नुकसान होईल. म्हणून ही गोल्डन गॅंग आणि त्याचे उमेदवार निवडणून यावेत याकरता सर्वच पक्षांनी हातमिळवणी केली आहे.

Updated: Oct 23, 2015, 02:23 PM IST
केडीएमसी निवडणूक - ''गोल्डन गॅंग'साठी सर्व पक्षांची हात मिळवणी  title=

कल्याण :  कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणूकीने आता जोर धरला असून, निवडून येण्याकरता सर्वच उमेदवारांनी आणि पक्षांनी आपली सर्व ताकद पणाला लावली आहे. तर दुसरीकडे काही असे उमेदवार निवडून यावेतच याकरता सर्वच पक्षांनी हातमिळणी केली आहे. ते उमेदवार आहेत "गोल्डन गॅंगचे". या गोल्डन गॅंगचे उमेदवार निवडून जर आले नाही तर सर्वच पक्षांचे मोठे आर्थिक नुकसान होईल. म्हणून ही गोल्डन गॅंग आणि त्याचे उमेदवार निवडणून यावेत याकरता सर्वच पक्षांनी हातमिळवणी केली आहे.

कल्याण डोंबिवलीमध्ये पाच वर्षात आपल्या नगरसेवकांनी काय कामे केली त्याची पोचपावती मतदानाच्या माध्यामातून देण्याची वेळ आलीये असं कल्याण डोंबिवलीकरांना वाटत असेल. पण, खरं तर नेहमी प्रमाणे या राजकीय नेत्यांनी याही वेळी तुम्हाला गृहीत धरलय. कारण या राजकीय पक्षांची विचार विचारसरणी वेगळी आहे यांच्यात किती वाद आहेत हे दाखविण्यासाठी हे सर्व पक्षीय नेते एकमेंकावर किती शाब्दिक चिखल फेक करतायेत पण मुळात या सर्व पक्षांनी अंडर टेबल गोल्डन गॅंगसाठी हातमिळवणी केलीये. ती अशी 

शिवसेनेचे गोल्डन गॅंग उमेदवार 
- वॉर्ड नंबर १६ घोलपनगर, 
- वॉर्ड नंबर ३६ बैल बाजार 
- वॉर्ड नंबर ४२ मेट्रो मॉल 
- वॉर्ड नंबर १०७ पिसवली 
- वॉर्ड नंबर ५५ गावदेवी 
या वॉर्ड मध्ये भाजप आणि मनसेने शिवसेनेच्या गोल्डन गॅंग उमेदवारांना जिंकून येण्यासाठी कमजोर उमेदवार दिलेत तर 

• मनसेचे गोल्डन गॅंग उमेदवार 
- वॉर्ड नंबर ८१ आनंदनगर 
- वॉर्ड नंबर ६८ रामनगर 
- वॉर्ड नंबर ८० एकतानगर 
या जांगामधील गोल्डन गॅंगमधील मनसेचे उमेदवार निवडून येण्यासाठी भाजप आणि शिवसेनेने कमकुवत उमेदवार दिलेत 

• भाजपचे गोल्डन गॅंग उमेदवार 
- वॉर्ड नंबर ४६ कांचनगाव
- वॉर्ड नंबर ४७ चोळेगाव 
- वॉर्ड नंबर ५० गरीबाचावाडा
- वॉर्ड नंबर ६२ खंबाळपाडा 
या वॉर्डात शिवसेना आणि मनसेने कमकुवत उमेदवार दिलेत

तर, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या गोल्डन गॅंग उमेदवारांसाठी तीन ठिकाणी सेना, मनसे आणि भाजपने हातमिळवणी केलीये. 

आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की, या गोल्डन गॅंगसाठी हे सर्व पक्ष या पातळीला का जातात तर ते ही जाणून घ्या 

पालिकेत खरी सत्ता असते गोल्डन गॅंगची 
- स्टॅंडींग कमिटीवर या गोल्डन गॅंगचा सभापती असतो 
- पालिकेच्या तिचोरीच्या चाव्या या गोल्डन गॅंगच्या हातात असतात 
- सर्व पक्षीय टक्केवारी घेणा-या नेत्यांना पैसा पोहोचवण्याचे काम ही गोल्डन गॅंग करते 
- याकरता, बिल्डरांना गळाला लावणे, विविध योजनेतून पैसा काढणे, व्यापा-यांकडून फंड गोळा करणे 
- या गोल्डन गॅंगचे नेक्सस गल्ली ते प्रक्ष प्रमुखांपर्यंत असतात

आता इतकी पैसे कमावून देणारी ही गोल्डन गॅंग कोणत्या पक्षाला नकोय. 

या गोल्डन गॅंग ने आपली व्यक्तीगत आणि राजकीय कारकिर्द तुमच्या आमच्या जिवावर सोन्यानं मडवलीये. पण, कल्याण डोंबिवलीला मात्र पितळेचा साज दिलाय. आता या गोल्डन गॅंगला निवडणुन देवून पुन्हा स्वत:ची फसवणुक करायची का ? हे कल्याण डोंबिवलीकरांनो तुम्हीच ठरवा. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.