भंडाऱ्यात प्रफुल्ल पटेल तर नाना पटोलेंची प्रतिष्ठापणाला

 जिल्ह्यात राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल तर भाजप खासदार नाना पटोलेंची प्रतिष्ठा पणाला लागलीय. भंडारा म्हणजे राष्ट्रवादीचा बालेकिल्ला. पण लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत भाजपनं राष्ट्रवादीला झटका दिला. त्यामुळे नगरपालिका निवडणुकीत आता चुरस निर्माण झालीय.

Updated: Oct 21, 2016, 10:17 PM IST
भंडाऱ्यात प्रफुल्ल पटेल तर नाना पटोलेंची प्रतिष्ठापणाला title=

भंडारा :  जिल्ह्यात राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल तर भाजप खासदार नाना पटोलेंची प्रतिष्ठा पणाला लागलीय. भंडारा म्हणजे राष्ट्रवादीचा बालेकिल्ला. पण लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत भाजपनं राष्ट्रवादीला झटका दिला. त्यामुळे नगरपालिका निवडणुकीत आता चुरस निर्माण झालीय.

भंडारा जिल्ह्यात भंडारा, तुमसर, पवनी आणि नव्यानं स्थापित झालेली साकोली अशा चार नगर पालिका आहे. त्यातल्या भंडारा आणि तुमसर नगर परिषदेत राष्ट्रवादी  काँग्रेसची सत्ता आहे. पवनी नगर परिषदेत शिवसेनेची सत्ता आहे मात्र याठिकाणी सत्ताधारी नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेस समर्पित आहे. नगरपालिकांच्या या रणसंग्रामात राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल आणि भाजप खासदार नाना पटोलेंची प्रतिष्ठापणाला लागली आहे. 

तर यावेळी भंडारा जिल्ह्यात साकोली नव्यानं प्रस्थापित झालेली नगर परिषद असून याठिकाणीही राष्ट्रवादीच बाजी मारेल असा विश्वास पदाधिकारी व्यक्त करतायत. त्यामुळे आता नगरपालिकांच्या या रणसंग्रामात कोण बाजी मारणार याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे.