पश्चिम बंगाल

वृदध ननवर बलात्कार प्रकरणी ५ जणांना अटक

पश्चिम बंगालमध्ये ७२ वर्षीय ननवर सामूहिक बलात्कार प्रकरणात पोलिसांनी पाच जणांना अटक केलीय. 

Mar 15, 2015, 01:27 PM IST

दरोडेखोरांचा ननवर सामूहिक बलात्कार, सीआयडी चौकशीचे आदेश

नदिया जिल्ह्यातील गंगनापूर इथल्या कॉन्व्हेंटमध्ये शुक्रवारी रात्री दरोडेखोरांनी क्रौर्याची परिसीमा गाठत एका ननवर सामूहिक बलात्कार केला. या घटनेचे तीव्र पडसाद शनिवारी परिसरात उमटले. संतप्त लोक रस्त्यावर आले आणि त्यांनी रस्ते आणि रेल्वे वाहतूक जाम करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी या घटनेच्या सीआयडी चौकशीचे आदेश दिले आहेत.

Mar 15, 2015, 09:14 AM IST

त्यानं भर सभेत ममता बॅनर्जींच्या पुतण्याच्या थोबाडीत मारली!

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे पुतणे खासदार अभिषेक बॅनर्जी यांना पक्षाच्याच एका कार्यकर्त्यांने भर सभेत श्रीमुखात भडकावल्याची घटना घडली. पश्चिम बंगालच्या मिदनापूरमध्ये एका रॅली दरम्यान हा प्रकार घडलाय. या प्रकारनंतर मंचावर एकच गोंधळ उडाला. 

Jan 4, 2015, 09:41 PM IST

शारदा चिट फंड घोटाळा : पश्चिम बंगालचे वाहतूक मंत्र्यांना अटक

पश्चिम बंगालमधील ममता बॅनजी सरकारमधील आणि तृणमूल काँग्रेसचे वाहतूक मंत्री मदन मित्रा यांना शारदा चिट फंड घोटाळा प्रकरणी सीबीआयने अटक केली. हा ममता यांना जोरदार झटका मानण्यात येत आहे.

Dec 12, 2014, 06:46 PM IST

तिनं थुंकी चाटायला दिला नकार, दुसऱ्यादिवशी नग्न प्रेत रेल्वे ट्रॅकवर

जलपाईगुडी जिल्ह्यातील धूपगुडी गावातील रेल्वे ट्रॅकवर एका अल्पवयीन मुलीचं नग्न प्रेत आढळलं. मिळालेल्या माहितीनुसार मुलीनं एक दिवसापूर्वी गावातील पंचायतीसमोर थुंकी चाटण्याचे आदेश दिले होते. मात्र तिनं हा आदेश नाकारला. हत्येपूर्वी मुलीवर बलात्कार झाल्याचा संशय आहे. 

Sep 3, 2014, 05:25 PM IST

धावत्या रिक्षात महिलेवर सामूहिक बलात्कार

पश्चिम बंगालमधील दक्षिण २४ परगना जिल्ह्यात पाच नराधमांनी एका महिलेवर धावत्या रिक्षात सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. बलात्कारानंतर नराधमांनी पीडित महिलेला बेशुद्धावस्थेत रिक्षेच्या बाहेर फेकून दिलं होतं.

Aug 3, 2014, 05:13 PM IST

पश्चिम बंगालची संपूर्ण आप टीम भाजपमध्ये

पश्चिम बंगालमधील आम आदमी पार्टीची राज्यातील संपूर्ण टीम संपली असल्याचा दावा भारतीय जनता पक्षाने केला आहे. आपच्या सर्व सदस्यांनी सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये प्रवेश केला आहे. राज्यातील भाजपचे अध्यक्ष राहुल सिन्हा यांनी शुक्रवारी मीडियाशी बोलताना सांगितले की, आम आदमी पार्टी राज्यातून संपली आहे. यातील सर्व सदस्यांनी आमच्या पक्षात सामील होण्याचा निर्णय घेतला आहे.

Jun 6, 2014, 08:33 PM IST

पाहा पश्चिम बंगालमध्ये कुणाला किती जागा मिळतील?

पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस आघाडीला सर्वाधिक जागा मिळणार असल्याचं एक्झिट पोलमधून दिसून येत आहे.

May 12, 2014, 07:25 PM IST

सोळाव्या लोकसभेसाठीचं मतदान संपन्न

सोळाव्या लोकसभेच्या अखेरच्या टप्प्यातील 41 जागांसाठीचे मतदान आज पार पडले. लोकसभा निवडणुकीचं मतदान एकूण सात टप्प्यात घेण्यात आलं. यावेळेसही पश्चिम बंगालमध्ये विक्रमी मतदान पार पडलं आहे.

May 12, 2014, 06:23 PM IST

लोकसभा निवडणुकीचा नववा आणि अंतिम टप्पा

लोकसभा निवडणुकीसाठी नवव्या आणि शेवटच्या टप्प्यात आज मतदान होतंय. उत्तर प्रदेश, बिहार आणि पश्चिम बंगाल या तीन राज्यांतील 41 लोकसभा मतदारसंघात आज मतदानाचा फुल अँड फायनल टप्पा पार पडणार आहे. नरेंद्र मोदी, अरविंद केजरीवाल, मुलायमसिंग यादव, कलराज मिश्र, जगदंबिका पाल, प्रकाश झा अशा दिग्गजांची प्रतिष्ठा या निवडणुकीत पणाला लागणार आहे.

May 12, 2014, 08:39 AM IST

बंगालच्या ‘सारदा चिटफंड’ घोटाळ्याची आता CBI चौकशी

पश्चिम बंगालमधील सारदा चिट फंड घोटाळ्याप्रकरणी सीबीआय चौकशीचे आदेश देण्यात आलेत. सुप्रीम कोर्टानं सीबीआयला चौकशीचे आदेश दिलेत. घोटाळ्यामध्ये पश्चिम बंगाल, ओडिशा आणि आसाममधील लोकांचे २००० कोटी रुपये या चिट फंड घोटाळ्यात बुडाले आहेत.

May 9, 2014, 12:00 PM IST

नरेंद्र मोदी ‘कागदी शेर’, ममता बॅनर्जींची टीका

नरेंद्र मोदी यांनी बंगालमधील बांकुर इथं घेतलेल्या प्रचारसभेत बांग्लादेशी आणि चिटफंडमदील दोषींना हल्ला चढवला. घुसखोरी केलेल्या बांग्लादेशींना परत जावंच लागेल असा इशारा मोदींनी दिला. याचबरोबर चिटफंडमधील दोषींना तुरुंगात टाका अशी मागणीही त्यांनी केली.

May 4, 2014, 05:10 PM IST

निवडणुकीचा सातवा टप्पा : गुजरातमध्ये 62% मतदान

देशातल्या सातव्या टप्प्यासाठी आज मतदान  पार पडलंय. या टप्प्यात सात राज्य आणि दोन केंद्रशासित प्रदेशातवल्या ८९ जागांचा समावेश आहे. गेल्या सहा टप्प्यांसारखाच या टप्प्यातही मतदारांनी चांगला प्रतिसाद दिलाय.

Apr 30, 2014, 07:34 PM IST

...असं झालं निवडणुकीच्या सातव्या टप्प्यात मतदान

लोकसभा निवडणुकीच्या सातव्या टप्प्याच्या मतदानाला सुरुवात झाली आहे. ९ राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील ८९ जागांवर आज मतदान पार पडत आहे. गुजरातसह, उत्तरप्रदेश आणि बिहारमधील अत्यंत बड्या नेत्यांचं भवितव्य आज मतपेटीत बंद होणार आहे.

Apr 30, 2014, 11:50 AM IST