जलपाईगुडी, पश्चिम बंगाल: जलपाईगुडी जिल्ह्यातील धूपगुडी गावातील रेल्वे ट्रॅकवर एका अल्पवयीन मुलीचं नग्न प्रेत आढळलं. मिळालेल्या माहितीनुसार मुलीनं एक दिवसापूर्वी गावातील पंचायतीसमोर थुंकी चाटण्याचे आदेश दिले होते. मात्र तिनं हा आदेश नाकारला. हत्येपूर्वी मुलीवर बलात्कार झाल्याचा संशय आहे.
मुलीच्या वडिलांना गावातील लोकं मारत होते आणि ती त्यांना वाचविण्याचा प्रयत्न करत होती. पीडित मुलीच्या वडिलांनी भाड्यानं ट्रॅक्टर घेतलं होतं मात्र ते पैसे फेडू शकले नाहीत. सांगण्यात येतंय की, तृणमूल काँग्रेसचे स्थानिक नेत्या नमिता रॉय या पंचायतीच्या अध्यक्षा होत्या. पंचायतीत त्यांचे पतीही उपस्थित होते.
मुलीच्या वडिलांनी धूपगुडी पोलीस स्टेशनमध्ये १३ जणांविरोधात बलात्कार, हत्या आणि अपहरणाची एफआयआर दाखल केलीय. यात सल्लागार मंडळाचा सदस्येचे पतीचंही नाव आहे. जलपाईगुडीचे एसपी कुणाल अग्रवाल आणि अॅडिशनल एसपी जेम्स कुजुर मंगळवारी रात्रीच घटनास्थळी पोहोचले.
पंचायतीत उपस्थित होत्या TMC नेत्या
अॅडिशनल एसपींनी सांगितलं की, पोलिसांनी दोघांना ताब्यात घेऊन चौकशी सुरू केलीय आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आलाय. वाद सोमवारी रात्री गावातील पंचायतीत सुरू झाला. मुलीच्या वडिलांनी ट्रॅक्टरचं भाडं भरण्यासाठी थोडा वेळ मागितला. मात्र पंचायतीनं तो देण्यास नकार दिला.
मुलगी घरातून बाहेर आली आणि गावकऱ्यांना आपल्या वडिलांना सोडण्याची विनंती करू लागली. आरोप होतोय की, यानंतरच पंचायत भडकली आणि तिला थुंकी चाटण्याचे आदेश दिले. मात्र मुलीनं तसं करण्यास नकार दिला. एक व्यक्ती तिथून मुलीला दूर घेऊन गेला. पोलिसांच्या मते तेव्हापासूनच मुलगी बेपत्ता होती.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.