वृदध ननवर बलात्कार प्रकरणी ५ जणांना अटक

पश्चिम बंगालमध्ये ७२ वर्षीय ननवर सामूहिक बलात्कार प्रकरणात पोलिसांनी पाच जणांना अटक केलीय. 

Updated: Mar 15, 2015, 03:32 PM IST
वृदध ननवर बलात्कार प्रकरणी ५ जणांना अटक title=

कोलकाता: पश्चिम बंगालमध्ये ७२ वर्षीय ननवर सामूहिक बलात्कार प्रकरणात पोलिसांनी पाच जणांना अटक केलीय. 

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांना शंका आहे की, या घटनेमागे शाळेच्याच काही जणांचा हात असू शकतो. ज्यात एक माजी कर्मचारीही सहभागी आहे. तपासात मोठं यश मिळालं, जेव्हा सीसीटीव्ही फुटेजमध्ये गँगरेपचे तीन आरोपी स्पष्टपणे दिसले. 

शुक्रवारी नदिया जिल्ह्यातील रानाघाट कॉन्व्हेंटमध्ये वृद्ध ननवर सामूहिक बलात्कार झाला. शाळा प्रशासनानुसार रात्री जवळपास १२च्या सुमारास तीन-चार जणं दरोड्याच्या हेतूनं शाळेत शिरले. विरोध करणाऱ्या ननवर त्यांनी बलात्कार केला. नंतर पीडितेच्या कपाटातील १२ लाख रुपये लुटून नेले. बदला घेण्याच्या इच्छेनं हा घृणास्पद प्रकार केला असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केलाय.

दुसरीकडे सकाळी जेव्हा हे प्रकरण उघडकीस आलं तेव्हा पीडित वृद्धेला हॉस्पिटलमध्ये भर्ती करण्यात आलं. घटनेनं संतप्त झालेल्या नागरिकांनी रस्त्यावर उतरून आपला रोष व्यक्त केला. तर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी प्रकरणाच्या सीआयडी चौकशीटे आदेश दिले आहेत. 
 

(पीटीआय इनपुटसह)

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.