मोठी बातमी! 'या' तारखेला सुरु होणार IPL 2025, BCCI ने पुढच्या 3 सीजनबाबत घेतला निर्णय

IPL 2025 : ऑक्शनपूर्वीच आयपीएल 2025 च्या तारखा समोर आल्या आहेत. एवढंच नाही तर बीसीसीआयने आयपीएलच्या पुढील 3 सीजनच्या तारखांबाबत सुद्धा मोठा निर्णय घेतला आहे. 

पुजा पवार | Updated: Nov 22, 2024, 12:53 PM IST
मोठी बातमी! 'या' तारखेला सुरु होणार IPL 2025, BCCI ने पुढच्या 3 सीजनबाबत घेतला निर्णय title=
(Photo Credit : Social Media)

IPL 2025 : इंडियन प्रीमिअर लीगच्या 18 व्या सीजनसाठी 24 आणि 25 नोव्हेंबर रोजी मेगा ऑक्शन (IPL 2025 Mega Auction) पार पडणार आहे. मेगा ऑक्शन अनेक खेळाडूंचं भवितव्य ठरणार असून  फ्रेंचायझी मजबूत संघ तयार करण्यासाठी स्टार खेळाडूंवर बोली लावतील. मात्र ऑक्शनपूर्वीच आयपीएल 2025 च्या तारखा समोर आल्या आहेत. एवढंच नाही तर बीसीसीआयने (BCCI) आयपीएलच्या पुढील 3 सीजनच्या तारखांबाबत सुद्धा मोठा निर्णय घेतला आहे. 

मेगा ऑक्शनमध्ये किती खेळाडूंवर लागणार बोली? 

22-26 नोव्हेंबर रोजी पर्थ येथे भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात पहिला टेस्ट सामना खेळवण्यात येणार आहे.  तर याच दरम्यान रविवार आणि सोमवारी सौदी अरेबियातील जेद्दाह येथे मेगा ऑक्शन पार पडेल. यंदाही ऑक्शनमध्ये 10 संघाचा सहभाग असून यात केवळ 204 स्लॉट्स रिकामे आहेत. तर तब्बल 575 खेळाडूंना ऑक्शनसाठी शॉर्ट लिस्ट करण्यात आले आहे. मीडिया रिपोर्टनुसार आयपीएल ऑक्शनपूर्वीच बीसीसीआयने आयपीएल 2025 चं नाही तर आयपीएल 2026 आणि 2027 सुरु होण्याच्या आणि फायनलच्या तारखा सुद्धा ठरवल्या आहेत. 

हेही वाचा : IND vs AUS BGT: अश्विन-जडेजा बाहेरचा रस्ता दाखवून 'या' दोन खेळाडूंनी केले पहिल्या कसोटीत भारताकडून पदार्पण

 

कधी सुरु होणार आयपीएल 2025?

ईएसपीएनक्रिकइन्फोच्या रिपोर्टनुसार, आयपीएलचा 18 वा सीजन हा पुढील वर्षी 14 मार्च रोजी सुरु होईल. तर फायनल सामना हा 25 मे रोजी पार पडेल. त्यानंतर आयपीएल 2026 चा सीजन हा 15 मार्च रोजी सुरु होईल तर याचा फायनल सामना हा 31 मे रोजी होईल. तर आयपीएल 2027 चा पहिला सामना हा 14 मार्चला खेळवण्यात येईल तर फायनल सामना हा 30 मे रोजी पार पडेल. आयपीएलने या तारखा ठरवल्या असल्या तरी यात भविष्यातील परिस्थितीनुसार बदल होऊ शकतात असे जाहीर करण्यात आले आहे. मात्र याबाबत बीसीसीआयकडून अद्याप अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. 

पूर्वीपेक्षा जास्त सामने खेळवले जातील : 

आयपीएल 2025 मध्ये आयपीएल 2024 च्या तुलनेत जास्त सामने खेळवले जातील. मागच्या सीजनमध्ये 74 सामने खेळवले गेले होते. तर मीडिया रिपोर्ट्सनुसार 2025 आणि 2026 मध्ये एकूण 84-84 सामने खेळवले जातील. त्यानंतर आयपीएल 2027 मध्ये 94 सामने आयोजित केले जातील. बीसीसीआयने आयपीएलचे प्रसारण हक्क विकताना ब्रॉडकास्टर्ससोबत सदर करार केला होता. संघांना मोठा दिलासा म्हणून, प्रमुख कसोटी खेळणाऱ्या देशांतील परदेशी खेळाडूंना त्यांच्या बोर्डाकडून आयपीएलच्या पुढील तीन हंगामात खेळण्याची परवानगी मिळाली आहे. ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, दक्षिण अफ्रीका, न्यूझीलंड, वेस्टइंडीज, श्रीलंका, अफगानिस्तान आणि झिम्बाब्वे इत्यादी देशांचे खेळाडू आयपीएल 2025 साठी उपलब्ध असणार आहेत. आयपीएल 2025 ला सुरुवात आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्यानंतर होईल.