www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
लोकसभेच्या अखेरच्या नवव्या टप्प्यात 41 जागांसाठी मतदान आज पार पडलं. सोळाव्या लोकसभेचा निकाल शुक्रवारी जाहीर होणार आहे. यामुळे जगातील सर्वात मोठी लोकशाही कुणाला कौल देते याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे
शेवटच्या टप्प्यातील 5 पर्यंतची मतदानाची टक्केवारी
बिहारमध्ये संध्याकाळी पाचपर्यंत 54 टक्के मतदान झालं, वाराणसीत संध्याकाळी 5 पर्यंत 53 टक्के मतदान झालं आहे.
उत्तर प्रदेशात संध्याकाळी पाचपर्यंत 55.29 टक्के मतदान झाल्याची माहिती आहे.
तर पश्चिम बंगालमध्ये यावेळीही रेकॉर्ड ब्रेक 79.03 टक्के मतदान झालं आहे. आझमगडमध्येही 57 टक्के मतदान झालंय.
लोकसभा निवडणुकीसाठी नवव्या आणि शेवटच्या टप्प्यात आज मतदान होतंय. उत्तर प्रदेश, बिहार आणि पश्चिम बंगाल या तीन राज्यांतील 41 लोकसभा मतदारसंघात आज मतदानाचा फुल अँड फायनल टप्पा पार पडणार आहे. नरेंद्र मोदी, अरविंद केजरीवाल, मुलायमसिंग यादव, कलराज मिश्र, जगदंबिका पाल, प्रकाश झा अशा दिग्गजांची प्रतिष्ठा या निवडणुकीत पणाला लागणार आहे.
या मतदानानंतर 16 मे रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर होणार आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेली प्रचाराची रणधुमाळी आता संपुष्टात आलीय. भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी, काँग्रेस पक्षाध्यक्षा सोनिया गांधी, उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्यासह यच्चयावत नेत्यांनी या रणधुमाळीत सहभाग घेतला.
जाहीर सभा, रोड शो, पदयात्रा या माध्यमातून मतदारसंघ पिंजून काढले. एकमेकांवरच्या आरोप-प्रत्यारोपांच्या फैरीमुळे यंदाची ही निवडणूक गाजली. विकासाच्या मुद्यावरून जातीपातीच्या राजकारणापर्यंत प्रचाराची पातळी घसरल्याचं चित्र यंदाच्या निवडणुकीत पाहायला मिळालं. मात्र आता प्रचाराचा धुरळा खाली बसला असून, आज होणा-या अंतिम मतदानाकडे सर्वांचं लक्ष लागलंय.
LIVE: लोकसभा निवडणुकीचा नववा आणि अंतिम टप्पा
@2.20- pm
माजी क्रिकेटर सौरभ गांगुलीने केले मतदान
Kolkata : Saurav Ganguly after casting his vote #Elections2014 pic.twitter.com/yTfHv2fAMh
— ANI (@ANI_news) May 12, 2014
@2.00- pm
अनेकांची नावे मतदार यादीत नसल्याने वाराणसीत मतदान केंद्राबाहेर गोंधळ
Varanasi: Voters protest alleging deletion of their names from the voters list pic.twitter.com/HPjQm67vux
— ANI (@ANI_news) May 12, 2014
दुपारपर्यंतचे अपडेट
बिहारमध्ये दुपारी 2 पर्यंत 43 टक्के मतदान
उत्तर प्रदेशात दुपारी 1 पर्यंत 36 टक्के मतदान
उत्तर प्रदेशातील जोनपूरमध्ये अभिनेता रवी किशनचं मतदान
@1.00 pmपर्यंत आकडेवाडी
-बिहार - 38 टक्के मतदान
-उत्तर प्रदेश - 37 टक्के मतदान
-पश्चिम बंगाल - 56.3 8टक्के मतदान
@12.00 pmपर्यंत आकडेवाडी
-बिहार - 31 टक्के मतदान
@11.00 amपर्यंत आकडेवाडी
-उत्तर प्रदेश - 12 टक्के मतदान
-बिहार - 21.17 टक्के मतदान
-पश्चिम बंगाल - 26.73 टक्के मतदान
- वाराणसी - 20 टक्के मतदान
@11.15 am
पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस लोकांमध्ये दहशतीचे वातावरण पसरवित आहेत. याकडे निवडणूक आयोगाचे लक्ष नाही, अशी टीका कम्युनिष्ट नेते सिताराम येचुरी यांनी आहे. ते तृणमूल काँग्रेसकडून करण्यात आलेल्या हाणामारीबाबत बोलत होते.
TMC is terrorizing people in WB, but EC it seems is concentrating on only one constituency in India-Sitaram Yechury pic.twitter.com/NSOQl4SVzn