त्यानं भर सभेत ममता बॅनर्जींच्या पुतण्याच्या थोबाडीत मारली!

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे पुतणे खासदार अभिषेक बॅनर्जी यांना पक्षाच्याच एका कार्यकर्त्यांने भर सभेत श्रीमुखात भडकावल्याची घटना घडली. पश्चिम बंगालच्या मिदनापूरमध्ये एका रॅली दरम्यान हा प्रकार घडलाय. या प्रकारनंतर मंचावर एकच गोंधळ उडाला. 

Updated: Jan 4, 2015, 09:41 PM IST
त्यानं भर सभेत ममता बॅनर्जींच्या पुतण्याच्या थोबाडीत मारली! title=

मिदनापूर: पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे पुतणे खासदार अभिषेक बॅनर्जी यांना पक्षाच्याच एका कार्यकर्त्यांने भर सभेत श्रीमुखात भडकावल्याची घटना घडली. पश्चिम बंगालच्या मिदनापूरमध्ये एका रॅली दरम्यान हा प्रकार घडलाय. या प्रकारनंतर मंचावर एकच गोंधळ उडाला. 

तृणमूल काँग्रेसच्या संतप्त कार्यकर्त्यांनी थोबाडीत मारणाऱ्या व्यक्तीला बेदम चोप दिलाय. यावेळी काही कार्यकर्त्यांनी पत्रकारांनाही टार्गेट केलं. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रीमुखात मारणारा कार्यकर्ता हा तृणमूल काँग्रेसचा कार्यकर्ता आहे की नाही हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. खासदार अभिषेक बॅनर्जी यांचं भाषण सुरू असताना अचानक हा व्यक्ती व्यासपीठावर चढला आणि त्यानं त्यांच्या श्रीमुखात लगावली. 

 

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.