Allu Arjun Pushpa 2 Controversy: साउथ सुपरस्टार अल्लू अर्जूनचा 'पुष्पा 2' चित्रपट 2024 मधील बहुप्रतिक्षित चित्रपटांपैकी एक आहे. सोशल मीडियावर या चित्रपटाची गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरु आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. 5 डिसेंबरला हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.
दरम्यान, अशातच आता 'पुष्पा 2' चित्रपटासंदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे. हरियाणामधील हिसार येथे या चित्रपटाबाबत गदारोळ झाला आहे. हिसार जिल्ह्यामधील एका गावात 'पुष्पा 2' चित्रपटाबाबत पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. या तक्रारीमध्ये एक आरोप करण्यात आला आहे. ज्यामध्ये या चित्रपटातील एका सीनने धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करण्यात आला आहे. 'पुष्पा 2' चित्रपटातील हा सीन हटवण्याची मागणी देखील या तक्रारीमध्ये करण्यात आली आहे. परंतु, पोलिसांनी अद्याप या प्रकरणी गुन्हा दाखल केलेला नाहीये.
'पुष्पा 2' चित्रपट वादाच्या भोवऱ्यात
मीडिया रिपोर्टनुसार, 'पुष्पा 2' चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये एका सीनमध्ये एका धर्माच्या भावना दुखावण्याचा प्रयत्न करण्यात आला असल्याचा आरोप करण्यात आला आहे. हिसार येथील कुलदीप कुमार यांनी ही तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीमध्ये कुलदीपने म्हटलं आहे की, 'पुष्पा 2' चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये अल्लू अर्जुन अर्धनारीश्वरच्या भूमिकेत दिसत आहे आणि माँ कालीचे चित्रही देखील दिसत आहे. या सीनमुळे धार्मिक भावना दुखावल्या जात असल्याचे कुलदीपने म्हटले आहे
हरियाणामध्ये 'पुष्पा 2' चित्रपटाबाबत गोंधळ
कुलदीप कुमारने दाखल केलेल्या तक्रारीमध्ये पुढे म्हटले आहे की, मी 'पुष्पा 2' चित्रपटातील सर्व कलाकारांचा आदर करतो. परंतु काही कलाकार पैशासाठी धार्मिक भावना दुखावत आहेत. माँ काली आणि अल्लू अर्जुनच्या अर्धनारीश्वरचा सीन चित्रपटातून काढून टाकण्याची मागणी त्याने केली आहे. जर 'पुष्पा 2' चित्रपटातील हा सीन काढला नाही तर हरियाणामध्ये हा चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही, असंही कुलदीपने म्हटलं आहे. मात्र, अल्लू अर्जुनचे चाहते त्याचा बहुप्रतिक्षित 'पुष्पा 2' या चित्रपटाच्या प्रदर्शनाची आतुरतेने वाट पाहत आहे. तर दुसरीकडे या चित्रपटावरून वाद निर्माण झाला आहे.