Maharashtra Vidhan Sabha Nivadnuk Results 2024 : विधानसभा निवडणुकीची मतमोजणी किती वाजता होणार सुरू? 'इथे' पाहा क्षणोक्षणीचे अपडेट्स

Maharashtra Election Results 2024 Live Streaming, When and Where to Check : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 साठी शनिवारी 23 नोव्हेंबरला मतमोजणी होणाराय.  288 जागांसाठी अत्यंत चुरशीच्या झालेल्या या निवडणुकीत अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली असून या निकालाचे प्रत्येक अपडेट कुठे पाहाता येणार ते जाणून घ्या. 

नेहा चौधरी | Updated: Nov 22, 2024, 07:33 PM IST
Maharashtra Vidhan Sabha Nivadnuk Results 2024 : विधानसभा निवडणुकीची मतमोजणी किती वाजता होणार सुरू? 'इथे' पाहा क्षणोक्षणीचे अपडेट्स title=
Maharashtra Vidhan Sabha Nivadnuk Results 2024 Live Streaming

Maharashtra Election Results 2024 : महाराष्ट्रात लोकशाही उत्सव सुरु असून शनिवारी 23 नोव्हेंबरला 288 जागांसाठी अत्यंत चुरशीच्या झालेल्या या निवडणुकीचा निकाल लागणार आहे. 4100 हून जास्त उमेदवार या निवडणुकीत नशीब आजमावत असून अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागलीय. राज्यात सत्ताधारी महायुती आणि विरोधी महाविकास आघाडी यांच्यात चुरशीची लढत होणार आहेत. महायुतीत भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना, तर महाविकास आघाडीमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, शरदचंद्र पवार पक्ष आणि काँग्रेस यांचा समावेश आहे. (Maharashtra Vidhan Sabha Nivadnuk Results 2024 Live Streaming When and Where to Check Maharashtra Election Results Live Updates)

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 मतमोजणी कधी?

शनिवारी सकाळी 8 वाजता मतमोजणी सुरुवात होणार आहे. विविध टीव्ही चॅनेल, न्यूज वेबसाइट्स आणि त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मसह, तुम्ही महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकाल 2024 च्या लाइव्ह कव्हरेज आणि रिअल-टाइम अपडेट्ससाठी https://zeenews.india.com/marathi/ आणि झी २४ तासवर पाहू शकतात. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल केंद्रीय निवडणूक आयोगाची अधिकृत वेबसाईट results.eci.gov.in वर जाहीर करण्यात येणार आहे. निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर महाराष्ट्र विधानसभेच्या प्रत्येक मतदारसंघाचे ताजे अपडेट्स आणि मतदारसंघनिहाय निकाल तुम्हाला पाहिला मिळतील. 

महाराष्ट्र विधानसभेच्या सत्तास्थापनेत महायुती असो किंवा मविआ यांना सत्तास्थापनेसाठी अपक्षांची मदत घ्यावी लागणार असल्याचा अंदाज एक्झिट पोलच्या सव्हेनुसार व्यक्त करण्यात आलाय. बहुतांश एक्झिट पोलचा असाच अंदाज असल्यानं सत्तास्थापनेसाठी महायुती किंवा मविआ यांना अपक्षांसोबतच लहान पक्षांच्या आमदारांची मदत घ्यावी लागणार आहे. त्यामुळे मनसे, शेकाप, वंचित, बविआ आणि प्रहारसोबतच अपक्ष निवडून येणाऱ्या आमदारांसाठी दोन्ही बाजुंनी आतापासूनच फिल्डिंग लावायला सुरूवात झालीय. तर वेळ पडल्यास अपक्षांची मदत घेऊ अशी प्रतिक्रीया शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यांनी दिलीय.

विजयाची शक्यता असलेले अपक्ष

- रवी राणा - बडनेरा
- समीर भुजबळ - नांदगाव
- राहुल जगताप - श्रीगोंदा
- सत्यजीत पाटणकर - पाटण
- राजेंद्र मुळक  - रामटेक
- विजय चौगुले  - ऐरोली
- सुधाकर घारे  - कर्जत, रायगड
- भिमराव धोंडे -  आष्टी पाटोदा
- रमेश आडसकर - माजलगाव
- राजेश लाटकर - कोल्हापूर उत्तर

दरम्यान निकाल लागण्यापूर्वीच महायुती आणि महाविकास आघाडीने अपेक्षित विजयी उमेदवाऱ्यांशी संपर्क करण्यास सुरुवात केली आहे. त्यांना पाठिंब्यासाठी फोन केले जात असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. त्यामुळे या निवडणुकीत कोण बाजी मारणार हे उद्या निकाला नंतर स्पष्ट होणार आहे. दुपारपर्यंत निवडणुकीच चित्र स्पष्ट होणार आहे.