www.24taas.com, झी मीडिया, बांकूर/पश्चिम बंगाल
नरेंद्र मोदी यांनी बंगालमधील बांकुर इथं घेतलेल्या प्रचारसभेत बांग्लादेशी आणि चिटफंडमदील दोषींना हल्ला चढवला. घुसखोरी केलेल्या बांग्लादेशींना परत जावंच लागेल असा इशारा मोदींनी दिला. याचबरोबर चिटफंडमधील दोषींना तुरुंगात टाका अशी मागणीही त्यांनी केली.
मोदी म्हणाले १६ मे नंतर आपलं गाठोडं बांधून आपल्या देशात परतावं. १६ मे रोजी लोकसभा निवडणुकांचा निर्णय जाहीर होणार आहे. त्यामुळं भाजपचं सरकार आल्यानंतर घुसखोरी करणाऱ्या बांग्लादेशींचा मुद्दा मुख्य अजेंड्यामध्ये असेल, असं मोदी म्हणाले होते. त्यालाच विरोध करण्यासाठी आता ममता बॅनर्जींनी मोदींना लक्ष्य केलंय.
बांग्लादेशीं विरोधात बोलणाऱ्या नरेंद्र मोदींमध्ये हिंमत असेल तर त्यांनी ‘हात तरी लावून दाखवावा, मी गप्प बसणार नाही’, असा इशारा तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी दिला आहे. यामुळं पश्चिम बंगालमधील लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या दोन टप्प्यांआधी वातावरण चांगलंच तापलंय.
शनिवार ममता बॅनर्जी या मुस्लिम बहुल पूर्व मेदिनीपूर जिल्ह्यातील नंदीग्राममध्ये पहिल्या सभेला संबोधित करत होत्या. त्यावेळी त्यांनी मोदींना लक्ष्य केलं. भाजप प. बंगालमधील वातावरण बिघडवू पाहताहेत. धर्म आणि जातीच्या नावाखाली त्या जनतेला वेगवेगळे करू पाहताहेत. १९७१मधील शरणार्थी इथं राहतात त्या बंगालींना भाजपनं स्पर्श जरी केला तरी मी शांत बसणार नाही. तसंच मोदी हे `कागदी शेर` असून त्यांचा सामना अद्याप `रॉयल बंगाल टायगर`शी झालेला नाही, असा टोलाही ममतांनी यावेळी लगावला. मोदी मीडियात स्वत:ची हवा करताहेत, असंही त्यांनी सांगितलं.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.