बंगालच्या ‘सारदा चिटफंड’ घोटाळ्याची आता CBI चौकशी

पश्चिम बंगालमधील सारदा चिट फंड घोटाळ्याप्रकरणी सीबीआय चौकशीचे आदेश देण्यात आलेत. सुप्रीम कोर्टानं सीबीआयला चौकशीचे आदेश दिलेत. घोटाळ्यामध्ये पश्चिम बंगाल, ओडिशा आणि आसाममधील लोकांचे २००० कोटी रुपये या चिट फंड घोटाळ्यात बुडाले आहेत.

Aparna Deshpande Aparna Deshpande | Updated: May 9, 2014, 12:02 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
पश्चिम बंगालमधील सारदा चिट फंड घोटाळ्याप्रकरणी सीबीआय चौकशीचे आदेश देण्यात आलेत. सुप्रीम कोर्टानं सीबीआयला चौकशीचे आदेश दिलेत. घोटाळ्यामध्ये पश्चिम बंगाल, ओडिशा आणि आसाममधील लोकांचे २००० कोटी रुपये या चिट फंड घोटाळ्यात बुडाले आहेत.
सुप्रीम कोर्टानं चिट फंड घोटाळ्यात सहभागी पश्चिम बंगालची सारदा कंपनी आणि ओडिशाच्या इतर ४४ संस्थांविरोधात चौकशीचे आदेश दिले आहेत. सोबत कोर्टानं दोन्ही राज्यातील पोलिसांना सीबीआयला सहकार्य करण्याचे आणि सर्व माहिती देण्याचेही आदेश दिले आहेत.
सारदा चिट फंड कंपनीचे अध्यक्ष सुदीप्त सेन या घोटाळ्याचे मुख्य आरोपी आहेत. ज्यांनी कंपनीच्या इतर दोन अधिकाऱ्यांसह काश्मीरमधून अटक करण्यात आली होती. सारदा कंपनीनं बंगालमधील अनेक नागरिकांचे पैसे बुडवले होते.
जवळपास ३० हजार कोटींचा हा घोटाळा एप्रिल २०१३मध्ये उघड झाला होता. कंपनीवर आरोप आहे की त्यांनी गुंतवणूकदारांकडून चुकीच्या पद्धतीनं पैसे जमवले आणि ते परत केले नाही. घोटाळा उघडकीस आल्यानंतर जेव्हा नागरिकांनी आपले पैसे मागितले तेव्हा कंपनीच्या अनेक एजंट्सनी आत्महत्या सुद्धा केली होती. या घोटाळ्यामुळं पश्चिम बंगालच्या ममता बॅनर्जी यांच्या सरकारवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.