पश्चिम बंगालची संपूर्ण आप टीम भाजपमध्ये

पश्चिम बंगालमधील आम आदमी पार्टीची राज्यातील संपूर्ण टीम संपली असल्याचा दावा भारतीय जनता पक्षाने केला आहे. आपच्या सर्व सदस्यांनी सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये प्रवेश केला आहे. राज्यातील भाजपचे अध्यक्ष राहुल सिन्हा यांनी शुक्रवारी मीडियाशी बोलताना सांगितले की, आम आदमी पार्टी राज्यातून संपली आहे. यातील सर्व सदस्यांनी आमच्या पक्षात सामील होण्याचा निर्णय घेतला आहे.

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Jun 6, 2014, 08:33 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, कोलकता
पश्चिम बंगालमधील आम आदमी पार्टीची राज्यातील संपूर्ण टीम संपली असल्याचा दावा भारतीय जनता पक्षाने केला आहे. आपच्या सर्व सदस्यांनी सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये प्रवेश केला आहे. राज्यातील भाजपचे अध्यक्ष राहुल सिन्हा यांनी शुक्रवारी मीडियाशी बोलताना सांगितले की, आम आदमी पार्टी राज्यातून संपली आहे. यातील सर्व सदस्यांनी आमच्या पक्षात सामील होण्याचा निर्णय घेतला आहे.
आम आदमी पार्टी मात्र, याचे खंडन केले आहे. राष्ट्रीय परिषदचे सदस्य प्रिंस पाठक यांनी या वृत्ताचा इन्कार केला आहे. बहुतांशी सदस्य सक्रिय होऊन काम करीत आहेत. काही जणांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
भाजपमध्ये शामिल झालेले आम आदमी पार्टीचे नेते महबूब जाफरी यांनी आरोप लावला की, केंद्रीय नेतृत्वामुळे पश्चिम बंगालमधील पक्ष कमकुवत होत आहेत. जाफरीने सांगितले, मोठ्या संख्येत पक्षाचे कार्यकर्ते आपली सदस्यत्व सोडले आणि भाजपमध्ये शामिल झाले आहेत.
आपने पश्चिम बंगालमधील चार जागेंवर निवडणूक लढवली होती. चारही ठिकाणी त्यांचे डिपॉझीट जप्त झाले होते.
आप सदस्यांसह काँग्रेसचे काही नेतेही भाजपमध्ये सामील होणार आहेत. वरिष्ठ काँग्रेस नेता देवकी नंदन पोद्दार यांचे चिरंजीव मनोज पोद्दार भाजपमध्ये सामील झाले आहेत.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.