www.24taas.com , झी मीडिया, नागपूर
सामाजिक न्यायमंत्री शिवाजीराव मोघे यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची आघाडी तोडून स्वतंत्रपणे स्वबळावर निवडणूक लढण्याची मागणी करत, आघाडी सरकारला घरचा आहेर दिलाय. ते रामटेक लोकसभा क्षेत्राच्या केंद्रस्तरीय मतदार अभिकर्ता मेळाव्यात नागपूरला बोलत होते.
आगामी २०१४च्या लोकसभा निवडणूका लक्षात घेता. मोघे यांचं हे वक्तव्य म्हणजे काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये असलेल्या अंतर्गत धुसफुसीचंच चित्र आहे.
पक्षासाठी आयुष्य घालवणाऱ्या काँग्रेस कार्यकर्त्यांना निवडणुकीत संधी मिळणं आवश्यक आहे. खासदार किंवा आमदाराला ५ वर्षांत प्रत्येक गावात जाणं शक्य नसल्याचं सांगत मतदार संघातून गायब राहणाऱ्या खासदार आणि आमदारांची एक प्रकारं त्यांनी पाठराखणच केलीय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.