टीम इंडिया

भारत-ऑस्ट्रेलियामध्ये एकच अंतर, त्यांच्याजवळ अश्विन आहे - क्लार्क

ऑस्ट्रेलियाचा माजी फास्ट बॉलर स्टुअर्ट क्लार्कचं म्हणणं आहे  की, गुरूवारी होणाऱ्या सेमीफायनलमध्ये भारतीय टीम फायद्यात आहे कारण त्यांच्याजवळ रविचंद्रन अश्विन आहे. तर मायकल क्लार्कच्या ऑस्ट्रेलियन टीमकडे अश्विनसारखा स्पिनर नाहीय.

Mar 23, 2015, 09:07 PM IST

सट्टेबाजारात टीम इंडियापेक्षा ऑस्ट्रेलियाला अधिक पसंती

वर्ल्डकप जिंकण्यासाठी सट्टेबाजारात ऑस्ट्रेलियाच्या संघाला सर्वाधिक पसंती दिली असल्याचं दिसतंय, कारण विश्वचषकात टीम इंडियाची धडाकेबाज कामगिरी सुरु असली तरी सट्टेबाजारात मात्र टीम इंडियाचा भाव घसरला आहे. 

Mar 23, 2015, 05:46 PM IST

'अंपायर्सनी चुकीचे निर्णय दिले नसते, तर आम्ही जिंकलो असतो' - हसिना

वर्ल्डकपच्या क्वॉर्टर फायनलमध्ये भारताकडून झालेला पराभव बांग्लादेशाच्या चांगलाच जिव्हारी लागलेला दिसतो. पराभवानंतर बांगला क्रिकेट बोर्ड आणि चाहत्यांनी रान माजवलं असतानाच खुद्द पंतप्रधानांनी या वादात उडी घेतली आहे.

Mar 22, 2015, 05:29 PM IST

टीम इंडियानं खरी करून दाखवली सचिनची भविष्यवाणी!

सचिन तेंडुलकर आणि क्रिकेट याबद्दल काहीच सांगायची गरज नाही. वर्ल्डकपबद्दल सचिननं केलेली भविष्यवाणी खरी ठरलीय आणि ती खरी करण्यासाठी टीम इंडियाच्या खेळाडूंनी महत्त्वाची भूमिका बजावलीय.

Mar 22, 2015, 04:36 PM IST

टीम इंडियाला भारताला सेमीफायनलचा मौका

रोहित शर्माच्या १३७ दमदार सेंच्युरीनंतर गोलंदाजांच्या भेदक कामगिरीमुळं भारतानं बांग्लादेशचा १०९ रन्सनी पराभव करत वर्ल्डकपच्या सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आहे. 

Mar 19, 2015, 05:45 PM IST

वर्ल्डकप २०१५ : पटेल, बिन्नी, रायडू अजूनही बेंचवरच!

क्रिकेट वर्ल्डकपमध्ये टीम इंडियानं सलग सहा वेळा विजय प्राप्त करून क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश मिळवलाय. पण, या १५ सदस्यांच्या टीममध्ये तीन चेहरे असेही आहेत ज्यांना खेळण्याची संधीच मिळालेली नाहीय... त्यामुळे, ते बेंचवर बसूनच विजयरथाचे साक्षीदार बनलेत. 

Mar 19, 2015, 03:49 PM IST

पाकिस्तान सेमीफायनलमध्ये पोहोचल्यास अजमलला मौका?

पीसीबी अध्यक्ष शहरयार खान यांनी सांगितलं की, पाकिस्तान टीम जर वर्ल्डकप सेमीफायनलमध्ये पोहोचली तर ऑफ स्पिनर सईद अजमलला ऑस्ट्रेलियाला पाठवता येईल.

Mar 19, 2015, 03:34 PM IST

आज भारत-बांग्लादेश मॅचनंतर हे रेकॉर्ड्स!

मेलबर्न क्रिकेट मैदानात आज सुरू असलेल्या भारत-बांग्लादेश क्वॉर्टर फायनल मॅचमध्ये दोन्ही टीमसाठी 'करो या मरो'ची स्थिती आहे. पण यादरम्यान आज अनेक रेकॉर्ड्स पण होऊ शकतात.

Mar 19, 2015, 12:49 PM IST

भारत - पाक मॅचची उत्सुकता... गूगलवर १० लाखांहून जास्त प्रश्न!

वर्ल्डकपमध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान सेमीफायनल मॅच खेळणार किंवा नाही? कोणत्याही क्रिकेट जाणकारासाठी हा महत्त्वाचा प्रश्न आहे. गूगलवर वर्ल्डकपमध्ये १५ फेब्रुवारी रोजी झालेल्या भारत-पाक मॅचवरून असेच हजारो प्रश्न दहा लाखांहून जास्त वेळा विचारण्यात आलेत. अॅडलेड ओव्हलवर १५ फेब्रुवारी रोजी खेळलेली हीच मॅच टीव्हीवर जवळपास २९ करोड लोकांनी स्टार टीव्हीवर पाहिली होती.. हाही एक रेकॉर्ड ठरला होता. 

Mar 19, 2015, 11:50 AM IST

टीम इंडिया : खेळाडूंना पत्नी, गर्लफ्रेन्डसोबत राहण्याची परवानगी

बीसीसीआयने टीम इंडियाच्या खेळाडूंना आपल्या पत्नीला किंवा गर्लफ्रेन्ड सोबत राहण्याची परवानगी दिली आहे. वर्ल्डकप दौऱ्यावर असलेल्या टीम इंडियाच्या खेळाडूंना यापूर्वी ही परवानगी देण्यात आली नव्हती. टीम इंडिया मेलबर्नला पोहोचली आहे, क्वार्टर फायनलमध्ये टीम इंडियाचा सामना बांगला देशशी होणार आहे.

Mar 16, 2015, 08:36 PM IST

क्वार्टर फायनल आधी महेंद्रसिंहचे प्रेरणादायी शब्द

स्टार स्पोर्टसने क्वार्टर फायनल आधी टीम इंडियाचा कॅप्टन, कॅप्टन कूल धोनीवर एक व्हिडीओ बनवला आहे. या ४० सेकंदाच्या व्हिडीओत धोनी खूप काही बोलून जातो, हे बोलणं भारतातील कानाकोपऱ्यातील युवकांसाठी प्रचंड प्रेरणादायी आहे.

Mar 15, 2015, 10:51 PM IST

शिखर धवन ट्‌विटरवर सर्वाधिक लोकप्रिय

टीम इंडियाचा डावखुरा आघाडीचा फलंदाज शिखर धवन हा सोशल मीडियावरील ट्‌विटरवर सर्वाधिक लोकप्रिय झालाय. शिखरने वर्ल्डकपमध्ये दोन शतके झळकावली आहेत.

Mar 12, 2015, 04:27 PM IST

टीम इंडियाच्या नावे 'सलग ऑल आऊट करण्याचा रेकॉर्ड'

 क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये भारताने एक नवा रेकॉर्ड केला आहे.  टीम इंडियाने आयरलँड टीमला ५० षटकांआधीच ऑल आऊट केलं. टीम इंडियाने वर्ल्डकपमध्ये लगोपाठ पाच टीम्सना ऑल आऊट केल्याचा रेकॉर्ड केला आहे. भारताच्या आक्रमक गोलंदाजीसमोर आयरलँडची टीम २५९ वर ऑल आऊट झाली. 

Mar 10, 2015, 12:21 PM IST

आयर्लंडला नमविल्यास भारत करणार वर्ल्ड रेकॉर्ड

 वर्ल्ड कपमध्ये इतिहास रचण्याच्या उंबरठ्यावर असलेली टीम इंडिया आत्मविश्वासासह उद्या आयर्लंडला नमवून एक नवा वर्ल्ड रेकॉर्ड करणार आहे. 

Mar 9, 2015, 01:50 PM IST

टीम इंडिया जिंकली, तर कुणाला 'मौका मौका'?

स्टार स्पोर्टसने आपला मौका-मौका प्रोमोची सिरीज सुरूच ठेवली आहे, ही सिरिज आणखी रंगतदार होतेय, मौका-मौकामध्ये आता आणखी एक ट्ववीस्ट आलाय, प्रोमोतील पाकिस्तानी समर्थक आता, टीम इंडियाच्या बाजूने उभा ठाकला आहे, हे गणित नेमकं काय आहे ते पाहा

Mar 8, 2015, 01:16 PM IST