टीम इंडिया

धोनी-विराट घेणार विश्रांती, मग कॅप्टन्सी कुणाकडे?

बांग्लादेश दौऱ्यासाठी आज मुंबईत टीम सिलेक्शन केलं जाणार आहे. धोनी आणि विराट कोहलीने विश्रांतीची मागणी केल्यानं या दौऱ्यावर ते आपल्याला खेळताना दिसणार नाहीत. या दौऱ्यावर टीम इंडिया एक टेस्ट आणि तीन वन-डे खेळणार आहे. 

May 20, 2015, 09:28 AM IST

बांग्लादेश दौऱ्यासाठी उद्या टीम इंडियाची निवड, कोहली कॅप्टन?

राष्ट्रीय क्रिकेट निवडकर्ते बांग्लादेश दौऱ्यासाठी उद्या टीम इंडियाची घोषणा करणार आहे. विराट कोहलीच्या हाती टीमची कमान सोपविणार असल्याचं नक्की मानलं जातंय. बीसीसीआयनं सांगितलं की, सीनिअर राष्ट्रीय निवड समितीची 20 मेला बैठक होणार आहे. ज्यात बांग्लादेशविरुद्ध 10 ते 14 जूनदरम्यान होणाऱ्या एक टेस्ट आणि 10 जूनपासून मीरपूरमध्ये होणाऱ्या तीन वनडे मॅचसाठी टीम निवडली जाईल.

May 19, 2015, 12:31 PM IST

एकत्रित प्रयत्नांतूनच 'टीम इंडिया' पुढे जाईल: मोदी

'केंद्र आणि राज्य सरकार यांनी मिळून टीम इंडिया प्रमाणे काम केलं पाहिजे,' असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. पंतप्रधान हे भारत-बांगलादेश सीमा कराराच्या दीर्घकाळ प्रलंबित प्रश्‍नाच्या पार्श्‍वभूमीवर आज पश्‍चिम बंगालचा दौऱ्यावर होते.

May 10, 2015, 06:52 PM IST

बांग्लादेश दौरा : भारतीय टीममध्ये नविन चेहऱ्यांना संधी

टीम इंडियाचा पुढील महिन्यात बांग्लादेश दौरा असणार आहे. ७ जूनला भारतीय टीम बांग्लादेशला रवाना होणार आहे. मात्र, या दौऱ्यात नविन चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता आहे.

May 6, 2015, 01:07 PM IST

जूनमध्ये टीम इंडिया बांग्लादेश दौऱ्यावर!

भारतीय क्रिकेट टीम एक टेस्ट आणि तीन वनडे आंतरराष्ट्रीय मॅचसाठी पुढच्या महिन्यात बांग्लादेशचा दौरा करणार आहे. 

May 5, 2015, 05:32 PM IST

डंकन फ्लेचर यांच्याकडून अपेक्षाभंग... पदरी निराशा!

गॅरी कस्टर्न यांच्यानंतर डंकन फ्लेचर यांनी टीम इंडियाच्या कोचपदाची सूत्र हाती घेतली. फ्लेचर हे टीम इंडियाला एका नव्या उंचीवर नेऊन ठेवतील अशी अपेक्षा होती. मात्र, फ्लेचर यांना त्यात काही यश आलं नाही. डंकन फ्लेचर यांना कोच म्हणून आपली छाप सोडता आली नाही. 

May 3, 2015, 10:32 PM IST

पॉवरफुल टीम इंडियाचे जनक... जॉन राईट!

जॉन राईट यांच्या रुपात भारताला पहिला परदेशी कोच लाभला. जॉन राईट यांचा काळ टीम इंडियासाठी निर्णायक ठरला. त्यांच्या काळात टीम इंडिया अतिशय चांगल्या पद्धतीने बांधली गेली. एक वर्ल्ड चॅम्पियन आणि पॉवरफुल टीम बनवण्याची सुरुवात जॉन राईट यांच्या काळात सुरु झाली. 

May 3, 2015, 09:58 PM IST

टीम इंडियाचे सर्वात यशस्वी कोच... गॅरी कस्टर्न!

गॅरी कस्टर्न हे टीम इंडियाचे सर्वाधिक यशस्वी कोच ठरले. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली टीम इंडियाने वर्ल्ड कपला गवसणी घातली. त्यांच्याच काळात टीम इंडियामध्ये अमूलाग्र बदल झाला. आपण जगातील कोणत्याही टीमला पराभूत करु शकतो आणि परदेशातही विजय साकारू शकतो हा आत्मविश्वास गुरु गॅरी यांनी टीम इंडियातील प्लेअर्समध्ये निर्माण केला. 

May 3, 2015, 09:52 PM IST

ग्रेग चॅपेल... हिरो की व्हिलन?

ऑस्ट्रेलियाचे माजी महान क्रिकेटपटू आणि कॅप्टन ग्रेग चॅपल हे कांगारुंसाठी जरी हिरो ठरले असले तरी भारतीय क्रिकेटविश्वात त्यांनी खलनायकाची भूमिका पार पाडली. ऑस्ट्रेलियन क्रिकेट जगतात आपल्या कामगिरीची छाप सोडणारे ग्रेग चॅपल हे भारतीय क्रिकेटसाठी मात्र घातक ठरले. 

May 3, 2015, 09:41 PM IST

सौरव गांगुली असेल टीम इंडियाचा नवा कोच - रिपोर्ट

डंकन फ्लेचरचा कार्यकाळ संपलेला आहे. टीम इंडियाचा पुढील कोच कोण? या प्रश्नाचं सध्या उत्तर मिळालं नाहीय. मात्र अनेक मोठ्या नावांची चर्चा सध्या जोरात सुरू आहे. मीडिया रिपोर्टनुसार या रेसमध्ये टीम इंडियाचा माजी कप्तान सौरव गांगुली पण आहे. बीसीसीआयचा एक भाग राहुल द्रविडला ही जबाबदारी सोपवू इच्छितातय तर एका इंग्रजी वृत्तपत्रानुसार गांगुलीला कोच व्हायची इच्छा आहे.

Apr 16, 2015, 05:20 PM IST

भारतीय कोच नियुक्तीवर विचार - दालमिया

 टीम इंडियाच्या नव्या कोच संदर्भात अनेक तर्क-वितर्कांना उधाण आले असताना क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष जगमोहन दालमिया यांनी डंकन फ्लेचर यांची छुट्टी करून भारतीय कोचच्या नियुक्तीवर विचार सुरू असल्याचे संकेत दिले आहे. 

Apr 10, 2015, 08:07 PM IST

माझ्या वडिलांच्या वक्तव्याशी माझा संबंध नाही - युवराज सिंह

युवराज सिंहचे वडील योगराज सिंह यांनी टीम इंडियाचा कॅप्टन महेंद्र सिंह धोनीवर वाईट शब्दात हल्ला चढवला होता. आपल्या वडिलांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देत युवराज सिंहनं सांगितलं की, मीडियामध्ये जे वक्तव्य आलं त्याच्याशी माझा काहीही संबंध नाही. 

Apr 8, 2015, 12:20 PM IST

पुन्हा परदेशी कोच की स्वदेशीला संधी?

टीम इंडियावर गेल्या 15 वर्षांपासून परदेशी कोचच वर्चस्व पाहायला मिळालंय. आता डंकन फ्लेचर यांचा कार्यकाळ संपत असून त्यांना पुन्हा संधी मिळण्याची शक्यता कमी आहे. त्यात पुन्हा परदेशी कोच मिळणार का स्वदेशी व्यक्तीला संधी देणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. 

Apr 6, 2015, 07:05 PM IST

टीम इंडियामध्ये लवकरच नोकरीची संधी

तुम्ही बरोबर ऐकलंय... टीम इंडियामध्ये निघालीय VCACANCY.. तुम्ही क्रिकेट खेळलं असेल... तुम्हाला क्रिकेट समजत असेल... तुम्ही क्रिकेटचे EXPERT असाल... तुमच्या नसानसात क्रिकेट असेल.... तर ही बातमी केवळ तुमच्यासाठीच आहे.

Apr 6, 2015, 06:52 PM IST

टीम इंडियाचा आगामी कोच कोण?

वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाला सेमी फायनलमध्ये पराभवाचा सामना करावा लागल्याने टीम इंडियावर जोरदार टीका झाली. तसेच टीम इंडियाचे कोच डंकन फ्लेचर यांच्यावर देखील टीका करण्यात आली. या वर्ल्ड कपनंतर टीम इंडियात बदल होण्याची शक्यता आहे, तसेच कोच डंकन फ्लेचर यांचा करारही संपुष्टात आला आहे. 

Apr 2, 2015, 10:11 PM IST