आयर्लंडला नमविल्यास भारत करणार वर्ल्ड रेकॉर्ड

 वर्ल्ड कपमध्ये इतिहास रचण्याच्या उंबरठ्यावर असलेली टीम इंडिया आत्मविश्वासासह उद्या आयर्लंडला नमवून एक नवा वर्ल्ड रेकॉर्ड करणार आहे. 

Updated: Mar 9, 2015, 01:50 PM IST
आयर्लंडला नमविल्यास भारत करणार वर्ल्ड रेकॉर्ड title=

हॅमिल्टन :  वर्ल्ड कपमध्ये इतिहास रचण्याच्या उंबरठ्यावर असलेली टीम इंडिया आत्मविश्वासासह उद्या आयर्लंडला नमवून एक नवा वर्ल्ड रेकॉर्ड करणार आहे. 

लगोपाठ चार विजयाने वर्ल्ड कपच्या क्वार्टर फायनलमध्ये जागा बनविलेल्या गत विजेता टीम इंडियाची नजर पाचव्या विजयाकडे आहे. उद्या टीम  इंडियाने जर आयर्लंडला नमवले तर वर्ल्ड कपमध्ये लगोपाठ नऊ विजय मिळविण्याचा रेकॉ़र्ड टीम इंडियाच्या नावावर होणार आहे. या अश्वमेध मोहिमेची सुरूवात २०११मध्ये वर्ल्ड कपच्या वेस्ट इंडिज विरूद्धच्या सामन्याने झाली होती. 

मागील सामन्यात वेस्ट इंडिजला नमवून भारताने सलग ८ विजय आपल्या नावावर केले आहे. या विजयाने टीम इंडियानेच आपल्या रेकॉर्डची बरोबरी केली आहे. २००३मध्ये दक्षिण आफ्रिकेत झालेल्या सौरव गांगुलीच्या नेतृत्वाखाली वर्ल्ड कप टीमशी बरोबरी केली आहे. 

दुसरीकडे भारताला नमवून क्वार्टर फाय़नलमध्ये जागा बनविण्यासाठी आयर्लंड उत्सुक असणार आहे. गेल्यावेळी भारत आणि आयर्लंडमध्ये बंगळुरूमध्ये टक्कर झाली होती. त्यावेळी युवराज सिंह याच्या अर्धशतकामुळे आणि पाच विकेटमुळे भारताला विजय मिळाला होता. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.