टीम इंडियानं खरी करून दाखवली सचिनची भविष्यवाणी!

सचिन तेंडुलकर आणि क्रिकेट याबद्दल काहीच सांगायची गरज नाही. वर्ल्डकपबद्दल सचिननं केलेली भविष्यवाणी खरी ठरलीय आणि ती खरी करण्यासाठी टीम इंडियाच्या खेळाडूंनी महत्त्वाची भूमिका बजावलीय.

Updated: Mar 22, 2015, 04:36 PM IST
टीम इंडियानं खरी करून दाखवली सचिनची भविष्यवाणी! title=

मुंबई: सचिन तेंडुलकर आणि क्रिकेट याबद्दल काहीच सांगायची गरज नाही. वर्ल्डकपबद्दल सचिननं केलेली भविष्यवाणी खरी ठरलीय आणि ती खरी करण्यासाठी टीम इंडियाच्या खेळाडूंनी महत्त्वाची भूमिका बजावलीय.

सचिननं फेब्रुवारीमध्येच सांगितलं होतं की, वर्ल्डकप सेमीफायनलमध्ये कोणती टीम पोहोचेल. फेब्रुवारीमध्ये इंग्लंडला आपली आत्मकथा 'प्लेइ्ंग इट माय वे'च्या लॉन्चिंगदरम्यान, जेव्हा सचिनला विचारलं गेलं २०१५मध्ये वर्ल्डकपमध्ये कोणती टीम सेमीफायनलमध्ये पोहोचेल, तर सचिननं उत्तर दिलं होतं, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, न्यूझिलंड आणि भारत!

सचिननं टीम इंडियाचं नाव तेव्हा घेतलं होतं, जेव्हा तज्ज्ञांनी ऑस्ट्रेलियामधील ट्राय सीरिजमध्ये टीम इंडियाचा पराभव पाहून वर्ल्डकरचा दावेदार टीम इंडियाला कुणीच मानत नव्हतं. टीम इंडियानं सुद्धा सचिनच्या या विश्वासाला पात्र ठरवत सलग सात मॅच जिंकत वर्ल्डकप सेमीफायनल गाठली. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.