मेलबर्न : बीसीसीआयने टीम इंडियाच्या खेळाडूंना आपल्या पत्नीला किंवा गर्लफ्रेन्ड सोबत राहण्याची परवानगी दिली आहे. वर्ल्डकप दौऱ्यावर असलेल्या टीम इंडियाच्या खेळाडूंना यापूर्वी ही परवानगी देण्यात आली नव्हती. टीम इंडिया मेलबर्नला पोहोचली आहे, क्वार्टर फायनलमध्ये टीम इंडियाचा सामना बांगला देशशी होणार आहे.
वर्ल्डकप टीममध्ये निवडण्यात आलेल्या खेळाडूंची अपेक्षा होती की, त्यांना आपल्या पत्नी किंवा गर्लफ्रेन्डसोबत हॉटेलात राहण्याची परवानगी देण्यात यावी. मात्र जोपर्यंत टीम इंडिया नॉक आऊटमध्ये पोहोचत नाही, तोपर्यंत परवानगी मिळणार नसल्याचं टीम इंडियाच्या व्यवस्थापनाने म्हटलं होतं. मात्र टीम इंडिया नॉक आऊटपर्यंत पोहोचल्यानंतर आता खेळाडूंना ही परवानगी बीसीसीआयने दिली आहे.
ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंना देखिल आपली पत्नी किंवा गर्लफ्रेन्डसोबत राहण्याची परवानगी मिळाली असल्याचं सांगण्यात येत आहे, यावरून टीम इंडियाच्या खेळाडूंनी देखिल बीसीसीआयकडे ही मागणी केली होती.
टीम इंडिया १९ मार्च रोजी मेलबर्न क्वार्टर फायनल सामन्यात बांगलादेश सोबत भिडणार आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.