भारत - पाक मॅचची उत्सुकता... गूगलवर १० लाखांहून जास्त प्रश्न!

वर्ल्डकपमध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान सेमीफायनल मॅच खेळणार किंवा नाही? कोणत्याही क्रिकेट जाणकारासाठी हा महत्त्वाचा प्रश्न आहे. गूगलवर वर्ल्डकपमध्ये १५ फेब्रुवारी रोजी झालेल्या भारत-पाक मॅचवरून असेच हजारो प्रश्न दहा लाखांहून जास्त वेळा विचारण्यात आलेत. अॅडलेड ओव्हलवर १५ फेब्रुवारी रोजी खेळलेली हीच मॅच टीव्हीवर जवळपास २९ करोड लोकांनी स्टार टीव्हीवर पाहिली होती.. हाही एक रेकॉर्ड ठरला होता. 

Updated: Mar 19, 2015, 11:50 AM IST
भारत - पाक मॅचची उत्सुकता... गूगलवर १० लाखांहून जास्त प्रश्न! title=

नवी दिल्ली : वर्ल्डकपमध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान सेमीफायनल मॅच खेळणार किंवा नाही? कोणत्याही क्रिकेट जाणकारासाठी हा महत्त्वाचा प्रश्न आहे. गूगलवर वर्ल्डकपमध्ये १५ फेब्रुवारी रोजी झालेल्या भारत-पाक मॅचवरून असेच हजारो प्रश्न दहा लाखांहून जास्त वेळा विचारण्यात आलेत. अॅडलेड ओव्हलवर १५ फेब्रुवारी रोजी खेळलेली हीच मॅच टीव्हीवर जवळपास २९ करोड लोकांनी स्टार टीव्हीवर पाहिली होती.. हाही एक रेकॉर्ड ठरला होता. 

या मॅचमध्ये भारतानं पाकिस्तानला ७६ रन्सनं पछाडून पाकिस्तानविरुद्ध वर्ल्डकपमध्ये रेकॉर्ड सहावा विजय नोंदवला. गूगलनं दिलेल्या माहितीनुसार, भारत-पाकिस्तान दरम्यान झालेल्या या मॅचशी निगडीत लाईव्ह स्कोअर आणि इतर माहिती जाणून घेण्यासाठी फॅन्सनं दहा लाखांहून जास्त वेळा गूगलला 'हीट' केलं होतं. 

या मॅचबद्दल जाणून घेण्यासाठी क्रिकेट फॅन्ससोबतच अनेक राजकीय व्यक्ती आणि बॉलिवूड स्टार्सही यामध्ये सहभागी झाले होते. इतकंच नाही तर त्या दिवशी जवळपास एक लाखांहून जास्त वेळा लोकांनी पाकिस्तान टीमबद्दल वेगवेगळी माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला.

गूगलच्या विश्लेषकांनुसार, १४ फेब्रुवारी रोजी जेव्हा टूर्नामेंट सुरू झाली तेव्हा जवळपास ५ लाख प्रश्न केवळ भारतातूनच विचारले गेले होते. 

वर्ल्डकपमध्ये भारताचा क्वार्टर फायनल सामना बांग्लादेशसोबत सुरू आहे. भारतानं ही मॅच जिंकली तर टूर्नामेंटच्या दुसऱ्या सेमीफायनलच्या विजेत्या टीमविरुद्ध टीम इंडियाला मॅच खेळावी लागेल.

म्हणजेच, सिडनीमध्ये खेळल्या जाणाऱ्या दुसऱ्या सेमीफायनल सामन्यात पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान होणाऱ्या विजेत्या टीमची टक्कर टीम इंडियाशी होऊ शकते. म्हणजेच पुन्हा एकदा भारत-पाकिस्तान आमने सामने येण्याची शक्यता आहेच... आणि याच्याबद्दलच क्रिकेट फॅन्सची उत्सुकता शिगेला पोहचलीय. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.