दीपिका-रणवीर होणार शाहरुख खानचे शेजारी, 100 कोटींचे आलिशान घर तयार, लवकरच होणार शिफ्ट?

दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग हे त्यांच्या नवीन घरामुळे सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहेत. ते लवकरच नवीन घरात शिफ्ट होणार असल्याच्या बातम्या येत आहेत. 

सोनेश्वर पाटील | Updated: Jan 8, 2025, 02:52 PM IST
दीपिका-रणवीर होणार शाहरुख खानचे शेजारी, 100 कोटींचे आलिशान घर तयार, लवकरच होणार शिफ्ट?  title=

Deepika Padukone and Ranveer Singh New House: बॉलिवूडमधील नेहमी चर्चेत असणारे कपल म्हणजेच दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग सध्या पालकत्वाचा आनंद घेत आहेत. दोघेही आनंदी वातावरणात आहेत. दीपिका पदुकोणने सप्टेंबर महिन्यात मुलीला जन्म दिला आहे. रणवीर आणि दीपिकाने त्यांच्या मुलीचे नाव दुआ असे ठेवले आहे.

मुलीच्या जन्मानंतर हे जोडपे त्यांच्या मुलीसोबत अनेकदा दिसले आहे. या जोडप्याने पापाराझींना मुलगी दुआचा चेहराही दाखवला आहे. दीपिका पदुकोण सध्या प्रसूती रजेवर आहे. तर रणवीर सिंगने त्याच्या कामाला सुरुवात केली आहे. दरम्यान, अशातच दोघेही लवकरच त्यांच्या नवीन घरात शिफ्ट होणार असल्याच्या बातम्या येत आहेत.

नवीन घरात शिफ्ट होणार दीपिका-रणवीर? 

बॉलिवूड लाईफच्या रिपोर्टनुसार, दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग त्यांच्या नवीन घरात शिफ्ट होणार आहेत. हे जोडपे लवकरच बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचे शेजारी बनणार आहेत. कारण दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंगचे नवीन घर शाहरुख खानच्या मन्नत बंगल्याजवळ आहे.

दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंगच्या आलिशान बंगल्याची किंमत अंदाजे 100 कोटी रुपये आहे. रणवीर सिंगचे हे घर 11,266 स्क्वेअर फूटमध्ये बांधण्यात आले आहे. मनी कंट्रोलच्या रिपोर्टनुसार, रणवीर आणि दीपिकाची टेरेस हे 1330 स्क्वेअर फूट आहे. या इमारतीत 16 ते 19 मजले आहेत. सोशल मीडियावर या आलिशान घराचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. ज्यामध्ये घराचे काम पूर्ण होत आल्याचं दिसून येत आहे.   

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

या चित्रपटात दिसणार दीपिका-रणवीर

दीपिका पदुकोण ही शेवटची 'सिंघम अगेन' या चित्रपटात दिसली होती. या चित्रपटात तिने शक्ती शेट्टीची भूमिका साकारली होती. या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान दीपिका प्रेग्नेंट होती. 'सिंघम अगेन'पूर्वी, ती 'कल्की 2898 एडी' या चित्रपटात दिसली होती. तर रणवीर सिंग हा 'सिंघम अगेन' चित्रपटातही दिसला होता. या चित्रपटात तो सिम्बाच्या भूमिकेत होता. 'सिंघम अगेन' पूर्वी रणवीर 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या चित्रपटात दिसला होता. सध्या रणवीर 'धुरंधर' चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे.