'अंपायर्सनी चुकीचे निर्णय दिले नसते, तर आम्ही जिंकलो असतो' - हसिना

वर्ल्डकपच्या क्वॉर्टर फायनलमध्ये भारताकडून झालेला पराभव बांग्लादेशाच्या चांगलाच जिव्हारी लागलेला दिसतो. पराभवानंतर बांगला क्रिकेट बोर्ड आणि चाहत्यांनी रान माजवलं असतानाच खुद्द पंतप्रधानांनी या वादात उडी घेतली आहे.

Updated: Mar 22, 2015, 05:29 PM IST
'अंपायर्सनी चुकीचे निर्णय दिले नसते, तर आम्ही जिंकलो असतो' - हसिना title=

ढाका : वर्ल्डकपच्या क्वॉर्टर फायनलमध्ये भारताकडून झालेला पराभव बांग्लादेशाच्या चांगलाच जिव्हारी लागलेला दिसतो. पराभवानंतर बांगला क्रिकेट बोर्ड आणि चाहत्यांनी रान माजवलं असतानाच खुद्द पंतप्रधानांनी या वादात उडी घेतली आहे.

अंपायरच्या कामगिरीवर तीव्र नापंसती व्यक्त करून पंतप्रधान शेख हसिना यांनी ‘बांग्लादेशाला कशा पद्धतीनं हरविण्यात आलं ते सर्वांनी पाहिलं,’ असं म्हटलं आहे. मेलबर्न इथं बांग्लादेशातील निर्वासितांनी राष्ट्रीय संघासाठी आयोजित केलेल्या कार्यक्रमात पंतप्रधान हसिना यांनी फोनवर खेळाडूंचं सांत्वन करत त्यांची पाठदेखील थोपटली. बीसीबीचे अध्यक्ष नजमुल हसन तसंच सर्व खेळाडूंचं त्यांनी अभिनंदन केलं. हसन यांनी फोनचा लाऊडस्पीकर ऑन केला होता.

वर्ल्डकपमध्ये खेळाडूंनी केलेल्या कामगिरीचं त्यांनी तोंडभरून कौतुक केलं. ही लय कायम राखा, असं आवाहन करत त्यांनी मुशर्रफ मुर्तझा आणि सहकाऱ्यांना पराभवामुळं खचू नका, असंही सांगितलं. नंतर बांग्लादेश न्यूजशी बोलताना हसिना यांनी ‘निराश होण्याचं काहीच कारण नाही, आम्हाला कशा पद्धतीनं हरविण्यात आलं, हे सर्वांनी पाहिलं. भविष्यात आम्ही नक्की जिंकू,’या शब्दांत प्रतिक्रिया दिली. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.