सट्टेबाजारात टीम इंडियापेक्षा ऑस्ट्रेलियाला अधिक पसंती

वर्ल्डकप जिंकण्यासाठी सट्टेबाजारात ऑस्ट्रेलियाच्या संघाला सर्वाधिक पसंती दिली असल्याचं दिसतंय, कारण विश्वचषकात टीम इंडियाची धडाकेबाज कामगिरी सुरु असली तरी सट्टेबाजारात मात्र टीम इंडियाचा भाव घसरला आहे. 

Updated: Mar 23, 2015, 05:46 PM IST
सट्टेबाजारात टीम इंडियापेक्षा ऑस्ट्रेलियाला अधिक पसंती title=

मुंबई : वर्ल्डकप जिंकण्यासाठी सट्टेबाजारात ऑस्ट्रेलियाच्या संघाला सर्वाधिक पसंती दिली असल्याचं दिसतंय, कारण विश्वचषकात टीम इंडियाची धडाकेबाज कामगिरी सुरु असली तरी सट्टेबाजारात मात्र टीम इंडियाचा भाव घसरला आहे. 

सट्टाबाजारात भारत चौथ्या स्थानावर असून सर्वात अधिक पसंती ऑस्ट्रेलियाला आहे. सट्टाबाजारात टीम इंडियावर ६ रुपये, न्यूझीलंडवर ४ रुपये, दक्षिण आफ्रिकेवर ४ रुपये, तर ऑस्ट्रेलियावर १.५ रुपयांचा सट्टा लावण्यात आला आहे. त्यामुळे 

वर्ल्डकपचा महासंग्राम आता अंतिम टप्प्यात पोहचला आहे. उपांत्य फेरीतील दोन सामने आणि अंतिम फेरीतील एक सामना बाकी आहे. या तीन सामन्यांवर तब्बल १ हजार कोटींहून अधिक रुपयांचा सट्टा लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

 या विश्वचषकात भारत अद्याप अजिंक्य राहिलेला आहे. सेमीफायनलमध्ये मात्र ऑस्ट्रेलियाच भारतावर मात करेल, असा सट्टाबाजाराचा अंदाज आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.