मुंबई : टीम इंडियाच्या नव्या कोच संदर्भात अनेक तर्क-वितर्कांना उधाण आले असताना क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष जगमोहन दालमिया यांनी डंकन फ्लेचर यांची छुट्टी करून भारतीय कोचच्या नियुक्तीवर विचार सुरू असल्याचे संकेत दिले आहे.
एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत दालामिया यांनी स्पष्ट केले, की विदेशी कोच पेक्षा भारतीय कोचला प्राधान्य देण्यात येणार आहे. आताच मी काही जाहीर करू इच्छित नाही. पण आम्ही भारतीय कोच संदर्भात विचार करीत आहोत. अजून पंधरा दिवस नावासंदर्भात वाट पाहावी लागणार असल्याचेही दालमिया यांनी सांगितले.
भारताची कसोटी क्रिकेटमधील खराब कामगिरीबाबत चिंता व्यक्त करत दालमिया यांना स्पष्ट केले की ते लवकरच या संदर्भात प्लान घेऊन येणार आहेत.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.