पॉवरफुल टीम इंडियाचे जनक... जॉन राईट!

जॉन राईट यांच्या रुपात भारताला पहिला परदेशी कोच लाभला. जॉन राईट यांचा काळ टीम इंडियासाठी निर्णायक ठरला. त्यांच्या काळात टीम इंडिया अतिशय चांगल्या पद्धतीने बांधली गेली. एक वर्ल्ड चॅम्पियन आणि पॉवरफुल टीम बनवण्याची सुरुवात जॉन राईट यांच्या काळात सुरु झाली. 

Updated: May 3, 2015, 10:35 PM IST
पॉवरफुल टीम इंडियाचे जनक... जॉन राईट! title=

मुंबई : टीम इंडियाच्या नव्या कोचचा शोध सुरु झाला आहे... आता नवा कोच कोण असेल याचीच उत्सुकता क्रिकेट जगताला लागून राहिलीय.याच अनुषंगाने काही महत्त्वाच्या कोचेसचा आढावा घेणारी विशेष लेखमालिका 'कुणी घडवलं, कुणी बिघडवलं?'... 
  
जॉन राईट यांच्या रुपात भारताला पहिला परदेशी कोच लाभला. जॉन राईट यांचा काळ टीम इंडियासाठी निर्णायक ठरला. त्यांच्या काळात टीम इंडिया अतिशय चांगल्या पद्धतीने बांधली गेली. एक वर्ल्ड चॅम्पियन आणि पॉवरफुल टीम बनवण्याची सुरुवात जॉन राईट यांच्या काळात सुरु झाली. 

'पॉवरफुल टीम इंडियाचे जनक' असं ज्यांचं वर्णन केलं जाऊ शकते असे कोच म्हणजे जॉन राईट... भारतीय क्रिकेट्च्या इतिहासात ज्या कोचचं नाव आदरानं घ्याव असं नाव म्हणेज जॉन राईट... न्यूझीलंडचे बॅट्समन आणि कॅप्टन म्हणून यशस्वी करियर संपल्यानंतर जॉन राईट दोन वर्ष सेल्समध्ये नोकरी करत होते. त्यानंतर केंट क्लबच्या कोचिंगची जबाबदारी संभाळल्यानंतर टीम इंडियाच्या कोचसारखा हाय-प्रोफाईल जॉब त्यांच्याकडे चालून आला. 

टीम इंडिसारख्या टीमला कोचिंग करणं हे खरतर मोठं टाक्स होतं. मात्र जॉन राईट यांनी हे टास्क यशस्वीपणे पार पाडल. त्यांनी 2000 ते 2005 असं तब्बल पाच वर्ष भारतीय टीमच्या कोचची जबाबदारी खंबीरपणे सांभाळली. त्यांच्या मार्गदर्शनखाली टीम इंडियामध्ये झपाट्याने सुधारणा झाली आणि एक शक्तीशाली टीम म्हणून ती क्रिकेट जगतात उदयास आली. त्यावेळेचा टीम इंडियाचा कॅप्टन सौरव गांगुलीसमवेत त्यांची जोडी चांगलीच जमली आणि मग या जोडगोळीनं भारताला काही अविस्मरणीय विजय मिळवून दिले. 

भारतीय दौ-यावर आलेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताने 2-1ने सीरिज जिंकली. या सीरिजमधील कोलकाता टेस्ट क्रिकेटरसिकांच्या नेहमीच स्मरणात राहील. फॉलो ऑन मिळाल्यानंतरही भारताने ही टेस्ट जिंकली होती. त्या टेस्टमधील द्रविड आणि लक्ष्मणची ऐतिहासिक खेळी आजही क्रिकेटप्रेमींच्या मनात ताजी आहेत. यानंतर ऑस्ट्रेलियात 4 टेस्टची सीरिज 1-1नं बरोबरीत राखण्यात भारताला यश आलं. भारताचा पारंपरिक शत्रू पाकिस्तानला त्यांच्या मातीत धूळ चारण्यातही भारताला जे यश मिळालं ते जॉन राईट यांच्याच काळात... 

2003वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाने शानदार परफॉर्मन्सच्या जोरावर फायनल गाठली होती. मात्र यानंतर काही महिन्यांतच टीम इंडियाचा सूर हरपला ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तानविरुद्ध भारताला पराभव पत्करावा लागला... आणि मग जॉन राईट यांनाही पदावरून दूर करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. तरीही जॉन राईट यांचा काळ टीम इंडियासाठी खूप महत्त्वपूर्ण ठरला असं म्हणावं लागेल. सचिन, गांगुली, द्रविड, लक्ष्मण, कुंबळे अशा दिग्गजांचा टीममध्ये समावेश असताना त्यांनी टीमचं कोचपद भूषवलं. 

अतिशय प्रतिभाशाली आणि शिस्तप्रिय प्लेअर्स आणि त्याच तोडीचा कोच असं समीकरण त्यावेळी चांगलंच जुळून आलं होत. यामुळेच त्यांच्या काळात टीम इंडियाने काही महत्त्वपूर्ण विजय नोंदवले. त्यांच्या काळात टीम इंडिया खूप चांगल्या पद्धतीने बांधली गेली त्याचा फायदा टीम इंडियाला पुढे अनेक वर्ष झाला. जॉन राईट हेदखील कधीही कोणत्याही वादात अडकेल नाहीत. केवळ खेळ उंचावण्यावर त्यांनी लक्ष केंद्रीत केलं त्याची फळ आपल्याला काही वर्षांनी मिळाली. भारतीय क्रिकेट इतिहासात कोच जॉन राईट यांचं नाव नेहमीच आदरनं घेतलं जाईल हे नक्की...

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.