टीम इंडियाचे सर्वात यशस्वी कोच... गॅरी कस्टर्न!

गॅरी कस्टर्न हे टीम इंडियाचे सर्वाधिक यशस्वी कोच ठरले. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली टीम इंडियाने वर्ल्ड कपला गवसणी घातली. त्यांच्याच काळात टीम इंडियामध्ये अमूलाग्र बदल झाला. आपण जगातील कोणत्याही टीमला पराभूत करु शकतो आणि परदेशातही विजय साकारू शकतो हा आत्मविश्वास गुरु गॅरी यांनी टीम इंडियातील प्लेअर्समध्ये निर्माण केला. 

Updated: May 3, 2015, 10:36 PM IST
टीम इंडियाचे सर्वात यशस्वी कोच... गॅरी कस्टर्न! title=

मुंबई : टीम इंडियाच्या नव्या कोचचा शोध सुरु झाला आहे... आता नवा कोच कोण असेल याचीच उत्सुकता क्रिकेट जगताला लागून राहिलीय.याच अनुषंगाने काही महत्त्वाच्या कोचेसचा आढावा घेणारी विशेष लेखमालिका 'कुणी घडवलं, कुणी बिघडवलं?'... 
 
गॅरी कस्टर्न हे टीम इंडियाचे सर्वाधिक यशस्वी कोच ठरले. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली टीम इंडियाने वर्ल्ड कपला गवसणी घातली. त्यांच्याच काळात टीम इंडियामध्ये अमूलाग्र बदल झाला. आपण जगातील कोणत्याही टीमला पराभूत करु शकतो आणि परदेशातही विजय साकारू शकतो हा आत्मविश्वास गुरु गॅरी यांनी टीम इंडियातील प्लेअर्समध्ये निर्माण केला. 
 
टीम इंडियीने वर्ल्ड कपला गवसणी घातल्यानंतर कोच गॅरी कस्टर्न यांना टीम इंडियातील प्लेअर्सने खांद्यावर घेत व्हिक्ट्री लॅप मारला होता. तब्बल 28 वर्षांनी वर्ल्ड कप जिंकण्याची किमया कोच गॅरी कस्टर्न यांच्यामुळेच टीम इंडिया करु शकली होती. वर्ल्ड कप विजयानंतरची दृश्य क्रिकेट फॅन्सच्या नेहमीच स्मरणात राहतील. गॅरी कस्टर्न यांची भारतीय क्रिकेट टीमचे कोच म्हणून संपूर्ण कारकिर्दच यशस्वी ठरली असं म्हणावं लागेल. 

दक्षिण आफ्रिकेचे क्रिकेटपटू असलेल्या गॅरी कस्टर्न यांनी एक बॅट्समन म्हणूनही आपली छाप सोडलीय. 2007मध्ये बीसीसीआयने कर्स्टन यांना टीम इंडियाच्या कोचपदासाठी विचारणा केली. बीसीसीआयने कर्स्टन यांच्याशी कोच म्हणून दोन वर्षांच्या कॉन्ट्रॅक्ट केला. मात्र 2011वर्ल्ड कपपर्यंत त्यांच्या कार्यकाळात वाढ करण्यात आली. टीम इंडियातील सर्व प्लेअर्सचा त्यांना कोच म्हणून पाठिंबा होता. 2008पासून त्यांनी अधिकृतरित्या टीम इंडियाच्या कोचिंकपदाची सूत्र हाती घेतली असली तरी 2007पासूनच ते टीम इंडियाबरोबर होते. 

विशेष म्हणजे त्यांच्या मार्गदर्शनाखाली टीम इंडियाची पहिलीच सीरिज कर्स्टन यांचा देश असलेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होती. टीम इंडियाने ती सीरिज 1-1 ने ड्रॉ केली. त्यांच्याच काळात ऑस्ट्रेलिया टीम भारतीय दौ-यावर असताना टीम इंडियाने 2-0ने सीरिज जिंकली होती. यानंतर श्रीलंकेमध्ये झालेल्या सीरिजमध्येही भारताने प्रथमच विजय साकारला. तर तब्बल 40 वर्षांनी न्यूझीलंडमध्ये न्यूझीलंडला टेस्ट आणि वन-डे सीरिजमध्ये पराभूत करण्याची किमयादेखील टीम इंडियाने गॅरी कस्टर्न यांच्या मार्गदर्शनाखालीच केली. युवा प्लेअर्समध्ये आत्मविश्वास निर्माण करण्याचं प्रमुख कामही त्यांनी केलं. 

भारतीय प्लेअर्सच्या तंत्रामध्ये सुधारणा करण्यात आणि त्यांना प्रोत्साहित करण्यात गॅरी कस्टर्न यशस्वी ठरले. स्ट्रॅटेजी प्रत्यक्षात कशी अमलात आणावी हे त्यांनी टीम इंडियाला शिकवलं. यामुळेच कॅप्टन धोनीने त्यांचं वर्णन 'The best thing to happen to Indian cricket'असं केलं होतं. 2011च्या वर्ल्ड कपनंतर सुरेश रैना, युसूफ पठाण आणि विराट कोहलीने त्यांना खांद्यावर घेऊन व्हिक्ट्री लॅप मारला. यावरुन त्यांच्या प्रती टीम इंडियातील प्लेअर्सना किती आदर होता हे दिसून येतं. 

टीम इंडियाचे कोच असताना गुरु गॅरी कधीही कोणत्याही वादात अडकले नाहीत की त्यांनी कधीही वादग्रस्त विधान केलं नाही. ते मीडियाशीदेखील अधिकृत प्रेस कॉन्फरन्सशिवाय कधी बोलले नाहीत. वर्ल्ड कपनंतर त्यांनी कोच म्हणून पुढे काम करण्यास नम्रपणे नकार दिला. आपल्याला आपल्या कुटुंबियांना वेळ द्यायचा असल्याचं सांगतं ते टीम इंडियासारख्या व्हीआयपी आणि लोकप्रिय टीमच्या कोच पदावरुन कोणताही बोलबाला न करता दूर झाले. भारतीय क्रिकेटच्या इतिहासात गुरु गॅरी कस्टर्न यांचा कार्यकाळ यशस्वी आणि ऐतिहासिक कार्यकाळ म्हणून नेहमीच लक्षात ठेवला जाईल. 
 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.