टीम इंडियाचा आगामी कोच कोण?

वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाला सेमी फायनलमध्ये पराभवाचा सामना करावा लागल्याने टीम इंडियावर जोरदार टीका झाली. तसेच टीम इंडियाचे कोच डंकन फ्लेचर यांच्यावर देखील टीका करण्यात आली. या वर्ल्ड कपनंतर टीम इंडियात बदल होण्याची शक्यता आहे, तसेच कोच डंकन फ्लेचर यांचा करारही संपुष्टात आला आहे. 

Updated: Apr 2, 2015, 10:11 PM IST
टीम इंडियाचा आगामी कोच कोण?   title=

मुंबई : वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाला सेमी फायनलमध्ये पराभवाचा सामना करावा लागल्याने टीम इंडियावर जोरदार टीका झाली. तसेच टीम इंडियाचे कोच डंकन फ्लेचर यांच्यावर देखील टीका करण्यात आली. या वर्ल्ड कपनंतर टीम इंडियात बदल होण्याची शक्यता आहे, तसेच कोच डंकन फ्लेचर यांचा करारही संपुष्टात आला आहे. 
 
डंकन फ्लेचर यांचे करार संपत असल्याने बीसीसीआय आता पुढील कालावधीसाठी संघाच्या कोचपदाची जबाबदारी कोणावर सोपवणार याचीच चर्चा आता सुरू झाली आहे.
 
दुसरीकडे, भारताचा माजी खेळाडू संजय बांगर आणि आर. श्रीधर यांनी देखील सहाय्यक कोच म्हणून चांगली कामगिरी बजावली आहे. यामुळेच पुन्हा एकदा भारतीय संघाला परदेशी कोच का हवा असा प्रश्न पुन्हा उभा राहिला आहे.

भारताकडे चांगले खेळाडू त्यांनी आपल्या कालखंडात भारताची प्रचंड सेवा केली आहे. राहुल द्रविड, सौरभ गांगुली, अनिल कुंबळे हे देखील या रेसमधील असतील का यावर आता चर्चांना उधाण आले आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.