हिवाळ्यात शरीराला आवश्यक उष्णता देईल ही लसणाची झणझणीत चटणी, नक्कीच ट्राय करा

Garlic and Green Coriander Chutney Recipe: भारतीय खाद्यपरंपरा ही अगदी वैशिष्ट्यपूर्ण आहे. भारतातील विविध राज्यांमध्ये वेगवेगळ्या चवीच्या खाद्यपदार्थांची मेजवानी असते. चटणी हे प्रत्येक राज्यात खाल्ले जाणारे तोंडी लावणे आहे. कोणत्या ठिकाणी चटणी भजींसोबत खाल्ली जाते तर कुठे डोसा, पराठ्यांसोबत खाल्ली जाते. 

Updated: Jan 19, 2025, 04:27 PM IST
हिवाळ्यात शरीराला आवश्यक उष्णता देईल ही लसणाची झणझणीत चटणी, नक्कीच ट्राय करा title=

भारतीय स्वयंपाकात चटणी ही साइड रोलमध्ये असली तरी अगदी महत्त्वाची भूमिका बजावते. तिची चव इतकी अप्रतिम असते की मुख्य भाजीचीही चव तिच्यासमोर कधीकधी फिकी वाटते. जर तुम्हाला चटणी खायला आवडत असेल, तर आजच ही खास लसूण-कोथिंबिरीची चटणी रेसिपी ट्राय करा. हिवाळ्याच्या दिवसांमध्ये लसूण खाणे शरीरासाठी फायद्याचे असते. हिरवी कोथिंबीर आणि लसणाची चटणी चवदार आणि तिखटसर लागते. तर मग जाणून घ्या लसूण-कोथिंबिरीची चटणी कशी बनवायची.

थंडीत लसूण खाण्याचे फायदे

लसणामध्ये असे पोषक घटक असतात जे शरीराची रोगप्रतिकारक क्षमता वाढवतात. यामध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन C, व्हिटॅमिन B6, मॅंगनीज आणि सेलेनियम असते. हे आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. लसण नियमित खाल्ल्याने सर्दी-खोकल्यापासून बचाव होतो. तसेच हिवाळ्यात हृदयाचे आरोग्य सुधारते आणि शरीर निरागी राहते.

लसणाची चवदार चटणी बनवण्यासाठी सामग्री:
Ingredients for Green Coriander and Garlic Chutney

1. दोन हिरव्या मिर्च्या
2. एक कप टवटवीत हिरवी कोथिंबीर
3. 9 ते 10 कळ्या लसूण
4. अर्धा चमचा खवलेले आले.
5. एक मोठा चमचा लिंबाचा रस
6. मिठ (चवीनुसार)
7. अर्धा चमचा जिरे (आवश्यकतेनुसार)

लसूण-कोथिंबिरीची चटणी कशी बनवायची?
How to make Garlic and Green Coriander Chutney

1. सर्वप्रथम 9-10 लसणाच्या पाकळ्या सोलून घ्या.
2. नंतर मिक्सरच्या भांड्यात 2 हिरव्या मिरच्या, 1 कप ताजी कोथिंबीर, अर्धा चमचा किसलेले आलं, चवीनुसार मीठ आणि थोडंसं पाणी घाला.
3. हे मिश्रण बारीक वाटून घ्या. पाणी कमीच वापरा, नाहीतर चटणी पातळ होईल आणि तिचा स्वाद कमी होईल.
4. वाटलेली चटणी एका बाऊलमध्ये काढा आणि त्यात 1 चमचा लिंबाचा रस आणि अर्धा चमचा चिंचेचा कोळ घाला.
5. चटणीत जिरा घाला त्यामुळे चटणीला एक वेगळाच फ्लेवर येतो.
6. सगळं व्यवस्थित मिसळा. तुमची लसूण-कोथिंबिरीची चविष्ट चटणी तयार आहे!

हिवाळ्यात गरमागरम पोळीसोबत किंवा भजीसोबत ही लसूण-कोथिंबिरीची चटणी सर्व्ह करा आणि चवदार चटणीचा आस्वाद घ्या.