IND VS AUS 2nd Test: टीम इंडिया सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया अशी 5 सामन्यांची बॉर्डर गावस्कर ट्रॉफी (Border Gavaskar Trophy) खेळत आहेत. 2020 नंतर टीम इंडिया प्रथमच डे-नाइट टेस्ट सामना खेळत असून पहिल्याच दिवशी मैदानात मोठा राडा झाला. शनिवारी (7 डिसेंबर) भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी एक वाद झाला. भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज (Mohammad Siraj) आणि ट्रॅव्हिस हेड यांच्यात जोरदार बाचाबाची झाली. ऑस्ट्रेलियाच्या ट्रॅव्हिस हेडने अवघ्या 141 चेंडूत 140 धावांची शानदार खेळी खेळवल्यावर सिराजने त्याची विकेट घेतली. गोलंदाजाने आक्रमकपणे सेलिब्रेशन केले आणि ड्रेसिंग रूमकडे बोट दाखवले. त्यानंतर दोघांमध्ये बाचाबाची झाली. आधी हेडने सिराजला आरोपी म्हणत वार केला तर आता सिराज मोहम्मद सिराजने ट्रॅव्हिस हेडवर पलटवार केला आहे.
ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावात ट्रॅव्हिस हेडला सिराजने बोल्ड केले. सिराजने त्याची विकेट सेलिब्रेट करायला सुरुवात केली आणि निघताना हेड त्याला काहीतरी म्हणाला. यानंतर सिराजही त्याला काहीतरी बोलताना दिसला. यावर दुसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर पत्रकार परिषदेत हेड म्हणाले की, मी सिराजच्या चेंडूचे कौतुक केले होते. पण सिराजने मला निघायला सांगितले. हेड पुढे म्हणाला, " ती माझीही प्रतिक्रिया होती पण मी त्याबद्दल जास्त बोलणार नाही. मी दिलेल्या प्रतिक्रियेने मी निराश झालो आहे पण मी स्वतःसाठीही उभा राहीन."
There was a bit happening here between Head and Siraj after the wicket #AUSvIND pic.twitter.com/f4k9YUVD2k
— 7Cricket (@7Cricket) December 7, 2024
याप्रकरणी मोहम्मद सिराजची प्रतिक्रियाही समोर आली आहे. त्याने ऑस्ट्रेलियन बॅट्समन खोटं बोलत असल्याचे सांगत हेडने त्याच्याशी गैरवर्तन केल्याचे सांगितले. तिसऱ्या दिवसाचा खेळ सुरू होण्यापूर्वी सिराजने हरभजन सिंगशी संवाद साधताना या प्रकरणाबद्दल सांगितले की, " मी गोलंदाजी करतानाची मजा घेत होतो. ही एक चांगली लढत होती कारण तो खरोखरच चांगली फलंदाजी करत होता. जेव्हा फलंदाज चांगल्या चेंडूवर षटकार मारतो तेव्हा वाईट वाटते. पण त्यामुळे मला ऊर्जा मिळाली. त्याला आऊट केल्यानंतर मी सेलिब्रेशन केले. त्यानंतर त्याने मला शिवीगाळ केली. तुम्ही ते टीव्हीवरही पाहू शकता. पण तो खोटे बोलला. ट्रॅव्हिस हेडची कृती चुकीची होती."
हे ही वाचा: Rishabh Pant: "खूप फोन कॉल्स, मेसेज झाले..." ऋषभ पंतबद्दल दिल्ली कॅपिटल्सच्या प्रशिक्षकाचा धक्कादायक खुलासा
ॲडलेड कसोटीदरम्यान समालोचन करताना हरभज सिंगने मोहम्मद सिराजचे समर्थन केले. तो म्हणाला की हेडला टाळ्या वाजवून सिराजच्या गोलंदाजीचे कौतुक करता आले असते पण तो काही बोलला नाही. त्याची कृती कौतुकास्पद नव्हती हे स्पष्टच आहे. हरभजन म्हणाला की,"हेड सिराजला दोष देत आहे, तर त्याने स्वतःच्या कृतीकडेही लक्ष दिले पाहिजे."