बर्थ डे बॉयने वाढदिवसाच्या दिवशी रचला इतिहास, अशी कामगिरी करणारा बुमराह जगातील एकमेव

Jasprit Bumrah IND VS AUS 2nd Test : 

पुजा पवार | Updated: Dec 6, 2024, 04:33 PM IST
बर्थ डे बॉयने वाढदिवसाच्या दिवशी रचला इतिहास, अशी कामगिरी करणारा बुमराह जगातील एकमेव  title=
(Photo Credit : Social Media)

IND VS AUS 2nd Test :  भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (India VS Australia)  यांच्यात सध्या 5 सामन्यांची बॉर्डर गावस्कर ट्रॉफी (Border Gavaskar Trophy) खेळवली जात असून 6 डिसेंबर पासून सीरिजमधील दुसऱ्या सामन्याला सुरुवात झालेली आहे. टॉस जिंकून फलंदाजी निवडलेल्या टीम इंडियाने पहिल्या इनिंगमध्ये 10 विकेट्स गमावून 180 धावा केल्या. तर गोलंदाजीची इनिंग सुरु झाल्यावर बर्थ डे बॉय जसप्रीत बुमराहने (Jasprit Bumrah) पहिली विकेट घेऊन इतिहास रचला. ऑस्ट्रेलियाचा फलंदाज उस्मान ख्वाजाला बाद करण्यात बुमराहला यश आले आणि त्याने नवीन रेकॉर्ड आपल्या नावे नोंदवला.

बॉर्डर गावस्कर ट्रॉफीचा दुसरा सामना हा एडिलेड येथे खेळवला जात असून यात ऑस्ट्रेलियाची इनिंग सुरु असताना जसप्रीत बुमराहने ऑस्ट्रेलियाची पहिली विकेट घेतली. बुमराहने 35 बॉलमध्ये 13 धावा केलेल्या उस्मान ख्वाजाला बाद केले. 11 व्या ओव्हरला टाकलेल्या शेवटच्या बॉलवर उस्मान ख्वाजाने मारलेला बॉलचा कॅच रोहित शर्माने पकडला आणि बुमराहला पहिली विकेट मिळाली. त्यामुळे बुमराह यावर्षातील सर्वात जास्त विकेट घेणारा गोलंदाज ठरला आहे. बुमराह टेस्ट क्रिकेटमध्ये 2024 मध्ये 50 विकेट्स घेणारा पहिला भारतीय गोलंदाज ठरला आहे. याबाबतीत आर अश्विन याने  46 विकेट्स घेतल्या असून तिसऱ्या क्रमांकावर 45 विकेट्स घेणारा शोएब बशीर आहे तर रवींद्र जडेजाच्या नावावर 44 विकेट्स आहेत. बुमराहने 2024 या वर्षात आतापर्यंत 11 टेस्ट सामने खेळले यात त्याने तब्बल 50 विकेट्स घेतल्या. मागील 22 वर्षांमध्ये कोणत्याही भारतीय गोलंदाजाने अशी कामगिरी केली नव्हती. यापूर्वी कपिल देव यांनी दोनदा तर जहीरने एकदा अशी कामगिरी केली होती.  

 

हेही वाचा : KL Rahul च्या विकेटवरून मैदानात मोठा ड्रामा, विराट बाउंड्रीपर्यंत येऊन परत गेला, नेमकं काय घडलं?

 

जसप्रीत बुमराहचा 30 वा वाढदिवस : 

भारताचा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आज 6 डिसेंबर रोजी त्याचा 30 वा वाढदिवस साजरा करत आहे. जसप्रीत बुमराह याचा जन्म 6 डिसेंबर 1993 रोजी अहमदाबाद येथे झाला होता. बुमराह भारतीय संघाकडून तीनही क्रिकेट फॉरमॅटमध्ये खेळतो. बुमराहने 30 टेस्ट 128 सामन्यात , 89 वनडे सामन्यात 149 तर 62 टी 20 सामन्यात त्याने 74 विकेट्स घेतल्या आहेत. बुमराह हा सध्याच्या घडीला टेस्ट क्रिकेटमधील नंबर 1 चा गोलंदाज आहे. 

भारताची प्लेईंग 11 :

यशस्वी जयस्वाल, केएल राहुल, शुभमन गिल, विराट कोहली, ऋषभ पंत (विकेटकीपर), रोहित शर्मा (कर्णधार), नितीश रेड्डी, रविचंद्रन अश्विन, हर्षित राणा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज

ऑस्ट्रेलियाची प्लेईंग 11 :

उस्मान ख्वाजा, नॅथन मॅकस्वीनी, मार्नस लॅबुशेन, स्टीव्हन स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, मिचेल मार्श, ॲलेक्स कॅरी (विकेटकीपर), पॅट कमिन्स (कर्णधार), मिचेल स्टार्क, नॅथन लियॉन, स्कॉट बोलँड