डोळ्यांवर पट्टी बांधून केविन पीटरसनची फटकेबाजी, व्हिडिओ वायरल

आक्रमक बॅट्समन म्हणून प्रसिद्ध असलेला इंग्लंडचा क्रिकेटपटू केविन पीटरसनला आपण प्रत्येक प्रकारचा शॉट मारतांना पाहिलंय. स्विच हिट त्याचा सर्वाधिक आवडता शॉट्स पैकी एक आहे, ज्याचा वापर तो अनेकदा करतो. मात्र एका व्हिडिओमध्ये पीटरसननं जो कारनामा केलाय, तो पाहून आपणही थक्क व्हाल.

Updated: Oct 8, 2015, 02:30 PM IST
डोळ्यांवर पट्टी बांधून केविन पीटरसनची फटकेबाजी, व्हिडिओ वायरल title=

मुंबई: आक्रमक बॅट्समन म्हणून प्रसिद्ध असलेला इंग्लंडचा क्रिकेटपटू केविन पीटरसनला आपण प्रत्येक प्रकारचा शॉट मारतांना पाहिलंय. स्विच हिट त्याचा सर्वाधिक आवडता शॉट्स पैकी एक आहे, ज्याचा वापर तो अनेकदा करतो. मात्र एका व्हिडिओमध्ये पीटरसननं जो कारनामा केलाय, तो पाहून आपणही थक्क व्हाल.

आणखी वाचा - क्रिकेटच्या इतिहासातील १० लज्जास्पद घटना

दक्षिण आफ्रिकेत जन्मलेल्या या ३५ वर्षीय क्रिकेटपटूनं डोळ्यांवर पट्टी बांधून आपल्या क्रिकेट स्किल्सचा जलवा दाखवलाय. आश्चर्य म्हणजे डोळे बंद असूनही त्यानं मैदानाच्या चारही बाजूंना जबरदस्त शॉट्स मारले.

या व्हिडिओमध्ये आपण त्याला स्विच हिट खेळतांना सुद्धा पाहू शकतो. या दरम्यान, पीटरसननं पाच पैकी चार बॉल्सवर सिक्सर मारले. त्याच्या एका शॉटनं तर घराच्या खिडकीची काचही तोडली.

जबरदस्त व्हिडिओ - 

 

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.