शिवाजी महाराजांचे नव्या स्वरुपात स्मारक - मुख्यमंत्री

अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराजांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक उभारण्यासाठी केंद्रीय पर्यावरण विभागाकडे पाठपुरावा करणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय. या स्मारकाचे चार महिन्यांत भूमिपूजन करण्यात येणार आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

Updated: Nov 21, 2014, 08:57 AM IST
शिवाजी महाराजांचे नव्या स्वरुपात स्मारक - मुख्यमंत्री title=

मुंबई : अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराजांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक उभारण्यासाठी केंद्रीय पर्यावरण विभागाकडे पाठपुरावा करणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय. या स्मारकाचे चार महिन्यांत भूमिपूजन करण्यात येणार आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी सह्याद्री अतिथीगृहात बैठक बोलावली होती. यावेळी जे.जे. स्कूल ऑर्टच्या वतीने तयार करण्यात आलेल्या स्मारकाच्या संकल्पचित्राचं सादरीकरण करण्यात आलं. शिवाय अन्य विभागांच्या मंजुरी तातडीने आणि वेळेची मर्यादा पाळून पूर्ण झाल्या पाहिजे असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं.

जगात अशाप्रकारचे स्मारक ज्या कंपन्यांनी उभारलंय त्याचंदेखील मार्गदर्शन घेण्यात यावं असं मुख्यमंत्र्यांनी बैठकीनंतर सांगितलंय. सर्व तांत्रिकबाबी तीन ते चार महिन्यांत पूर्ण करुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या स्मारकाचे भूमीपूजन करण्यात येईल अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. 

हे स्मारक अरबी समुद्रातील भव्य अशा खडकावर उभारणार असून ते राजभवनापासून दीड किलोमीटर अंतरावर, तर मरीन ड्राईव्हपासून साडेतीन किलोमीटर आणि गेट वे ऑफ इंडियापासून साधारणत: १o ते १२ किलोमीटरवर असेल. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.